बॉलिवूड अभिनेत्री नताशा आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या नात्याची चर्चांनी सध्या जोर धरला आहे. नुकताच नताशा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नताशा, ‘समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती आणि परिस्थिती माहिती नसताना कोणाला जज करणं योग्य नाही…’ असं म्हणताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे नताशा हिने साखरपुड्याची अंगठी काढली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.
नताशा हिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या बोटात साखरपुड्याची अंगठी दिसत नाहीये. ज्यामुळे नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून नताशावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करतम म्हणाली, ‘ज्ञान देऊ नकोस…’, नताशा हिचं म्हणणं आहे की, जर कोणी आपल्याप्रमाणे वागत नसेल, तर लोकं न थांबता, न विचार करता काहीही बोलत सुटतात… त्या व्यक्तीच्या मनातील भावना आपण समजून घेतच नाही… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये नताशा हिच्या वक्तव्याची चर्ची रंगली आहे. यावर नेटकरी म्हणाले, ‘ज्याला नात्यांमध्ये आलेला कडवटपणा मिटवायचा असेल तो देखावा करत नाही. वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो…’, व्हिडीओनंतर नताशा – हार्दिक यांच्या नात्यात काही बदल होऊ शकतात अशी शक्यता देखील चाहत्यांनी वर्तवली आहे. तर अनेकांनी दोघांना वाद मिटवण्याचा देखील सल्ला दिला आहे.
नताशा म्हणाली, आपण थोडं कमी जजमेंटल असायला हवं.. संयम ठेवून समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्याच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र नताशा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. दरम्यान, दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांवर अधिकृत घोषणा केलेली नाही. पण नताशा कायम सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट करत असते.
सांगायचं झालं तर, T 20 वर्ल्ड कप जिंकून घरी परतल्यानंतर देखील हार्दिक याचं स्वागत फक्त त्याच्या मुलाने केलं. तेव्हा देखील नताशा पती आणि मुलासोबत नव्हती. ज्यामुळे नताशा हिला ट्रोल देखील करण्यात आलं. हार्दिक याला पूर्ण भारताने शुभेच्छा दिल्या पण नताशाने एकही पोस्ट न केल्यामुळे चर्चांनी उधाण आलं आहे.