नताशा पेक्षा चांगलीच…, हार्दिक पांड्यासोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

| Updated on: Jul 11, 2024 | 10:56 AM

Hardik Pandya - Natasa Stankovic: हार्दिक पांड्या - नताशा यांचा मोडला संसार, होणार घटस्फोट? मिस्ट्री गर्लसोबत हार्दिक पांड्याचा फोटो समोर, अनेक जण म्हणाले, 'नताशा पेक्षा चांगलीच...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा - हार्दिक यांच्या नात्याची चर्चा...

नताशा पेक्षा चांगलीच..., हार्दिक पांड्यासोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनिकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. घटस्फोटाची चर्चा सुरु झाल्यापासून दोघांचे एकत्र फोटो देखील समोर आले नाहीत. तर टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही. दरम्यान, हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, क्रिकेटपटूचे एका मिस्ट्री गर्लसोबत फोटो व्हायरल होत आहेत. खुद्द त्या मिस्ट्री गर्लने हार्दिक याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. शिवाय दोघांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्यासोबत मिस्ट्री गर्लच्या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी तर ‘नताशा पेक्षा हिच बरी…’ अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासोबत असलेल्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगत आहे, ती मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून प्राची सोलंकी आहे. प्राची सोलंकी प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

प्राची सोलंकी हार्दिक याची मोठी चाहती आहे. फोटो आणि व्हिडीओमध्ये प्राची आणि हार्दिक आनंदी दिसत आहेत शिवाय दोघांनी ट्विनिंग देखील केलं आहे. प्राची हिने फक्त हार्दिक पांड्यासोबतच नाही तर, हार्दिक भाऊ क्रुणाल पंड्या आणि वहिनी पंखुडी हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट केले आहेत.

 

 

हार्दिक पांड्या याच्यासोबत व्हिडीओ पोस्ट करत प्राची कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘ जेव्हा मी वर्ल्ड कप हिरोला भेटते… कोणी मला चिमटा काढेल का? ‘ शिवाय प्राची हिने हार्दिक पांड्याचे आभार देखील मानले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राची – हार्दिक यांच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा सुरु आहे. व्हिडीओला प्राची हिने ‘चाहे जिसे दूर से दुनिया, वो मेरे क़रीब है… ‘ हे गाणं लावलं आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात वाद?

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही. विजयी होऊन घरी परतल्यानंतर हार्दिक याने मुलासोबत आनंद साजरा केला, पण तेव्हा नताशा नसल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं. पण दोघे घटस्फोट घेणार आहेत की नाही? यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.