हार्दिक पांड्या याच्या पत्नीचा मोठा खुलासा, अखेर फंक्शन सोडून नताशा ही…

| Updated on: Jul 15, 2024 | 11:44 AM

Hardik Pandya and Natasha stankovic : क्रिकेटर हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नताशा दिसते. नताशा आणि हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत.

हार्दिक पांड्या याच्या पत्नीचा मोठा खुलासा, अखेर फंक्शन सोडून नताशा ही...
Natasha Stankovic and Hardik Pandya
Follow us on

हार्दिक पांड्या याच्यावर संपूर्ण देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हार्दिक पांड्या हा T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसला. हार्दिक पांड्या नुकताच भारतात दाखल झाला. अत्यंत खास पद्धतीने भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. हेच नाहीतर हार्दिक पांड्या याच्या घरी देखील त्याच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हार्दिक पांड्याने लेकासोबत खास धमाल केली. हार्दिक पांड्या याच्या स्वागतासाठी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक उपस्थित नसल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

हार्दिक पांड्या हा अंबानी यांच्या फंक्शनसाठी देखील पोहोचला होता. मात्र, यावेळी देखील हार्दिक पांड्या याच्यासोबत त्याची पत्नी दिसली नाही. तो आपला भाऊ आणि वहिणीसोबत या पार्टीला पोहोचला. कोणतीही पार्टी असो किंवा फंक्शन प्रत्येकवेळी हार्दिक पांड्या याच्यासोबत त्याची पत्नी नेहमीच असायची.

हार्दिक पांड्या याच्या स्वागतासाठी आणि अंबानी यांच्या फंक्शनमध्ये नताशा दिसली नसल्याने अनेकांनी विचारले की, अखेर नताशा नेमकी आहे तरी कुठे? आता याचे उत्तर नताशा हिच्याकडूनच देण्यात आले. हार्दिक पांड्या अंबानींच्या फंक्शनमध्ये असताना नताशा ही आपल्या मुलासोबत धमाला करताना दिसली. मुलासोबत खास वेळ नताशा घालवत आहे.

नताशा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर याचा एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये सर्वात अगोदर नताशा ही रूममध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये फोटोसाठी पोझ देताना नताशा ही दिसत आहे. यासोबत मुलासोबत गेम खेळतानाही नताशा दिसत आहे. तिने जिमचा फोटो शेअर केलाय.

पोस्ट शेअर करत नताशा हिने खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. नताशा हिने लिहिले की, Living in gratitude. आता नताशा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अखेर नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये वाद नेमका कशामुळे सुरू आहे, हे मात्र अजूनही कळू शकले नाहीये. नताशा हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत थेट म्हटले होते की, लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे.