भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर यांचा घटस्फोट होणार असल्याचीही चर्चा आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक विभक्त राहत आहेत. भारतीय संघाने T20 सामना जिंकल्यानंतरही नताशा हिने एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच हार्दिक आणि एका मिस्ट्री गर्लचे व्हिडीओ आणि काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
हार्दिक पांड्या आणि मिस्टी गर्लचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता दुसरीकडे नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. नताशा स्टॅनकोविक हिचे हे व्हिडीओ जिममधील आहेत. हे व्हिडीओ शेअर करत नताशा स्टॅनकोविक हिने खास कॅप्शनही शेअर केले आहे.
नताशा स्टॅनकोविक हिला देवाची आठवण येताना दिसत आहे. नताशा स्टॅनकोविक ही स्वत:ला प्रेरणा देताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये नताशा स्टॅनकोविक ही जिममध्ये आलीये आणि ती गाणे ऐकत ऐकत व्यायाम करताना दिसत आहे. ट्रेडमिलवर पळताना नताशा स्टॅनकोविक ही दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये जिममध्ये बसून नताशा स्टॅनकोविक हे कुत्र्यांना खेळवताना दिसत आहे.
यासोबतच तिने कानाला हेडफोन लावला असून ती गाणे ऐकत त्यांच्यासोबत खेळत आहे. नताशा स्टॅनकोविक ही हार्दिक पांड्याला विसरण्यासाठी हे करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. नताशा स्टॅनकोविक ही हार्दिक पांड्या याच्यावर काही गोष्टींमुळे नाराज असल्याचे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले.
यासोबतच हार्दिक पांड्या आणि नताशा दोघेही वाद मिटवण्याच्या तयारीत नाहीत. पुढे यांच्या नात्यामध्ये काय होईल हे सध्याच सांगता येत नसल्याचे त्या व्यक्तीने म्हटले. हेच नाहीतर अंबानींच्या पार्टीमध्येही हार्दिक पांड्या हा आपला भाऊ आणि वहिणीसोबत पोहोचला होता. T20 मॅचमध्येही हार्दिक पांड्या याला सपोर्ट करण्यासाठी नताशा ही पोहोचली नव्हती. नताशा ही सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करताना दिसत आहे.