56 व्या वयात लग्न केल्याने अरबाज खानची थेट उडवली खिल्ली, मलायका अरोरा ही..

| Updated on: Mar 06, 2024 | 1:01 PM

अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अरबाज खान याने दुसरे लग्न केले. अरबाज खान याच्या पत्नीचे नाव शूरा खान आहे. अरबाज खान आणि शूराच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

56 व्या वयात लग्न केल्याने अरबाज खानची थेट उडवली खिल्ली, मलायका अरोरा ही..
Follow us on

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 2016 मध्ये अचानक घटस्फोट घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर यांचे घटस्फोटाचे नेमके कारण काय? यावर विविध चर्चा रंगताना दिसल्या. घटस्फोट झाल्यानंतरही अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दिसले. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. मध्यंतरी चर्चा होती की, लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लग्न करतील. मात्र, मलायका आणि अर्जुन यांनी त्यावर बोलणे कायमच टाळले.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना एक मुलगा देखील आहे. नुकताच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान याने वयाच्या 56 व्या वर्षी लग्न केल्याने सर्वांनाच धक्का बसला. फक्त हेच नाही तर शूरा खान आणि अरबाज खान यांच्यामध्येही वयाचा मोठे अंतर आहे. वडिलांच्या लग्नात धमाल करताना अरहान खान हा दिसला.

आता थेट एका शोमध्ये 56 व्या वर्षी लग्न केल्याने अरबाज खान याचा मजाक हा उडवण्यात आलाय. नुकताच अरबाज खान हा न्यू काॅमेडी शो मेडनेस मचाएंगे: इंडिया को हंसाएंगेमध्ये पोहचला. यावेळी हर्ष गुजराल याने थेट अरबाज खान याची दुसऱ्या लग्नावरून खिल्ली उडवली आहे. या शोमध्ये गेस्ट म्हणून अरबाज खान हा पोहचला होता.

हर्ष गुजराल म्हणाला की, अरबाज भाई माझे वडिल तुमचे खूप मोठे चाहते आहेत आणि मला नेहमीच म्हणतात की, अरबाज भाईकडून काहीतरी शिक. मी त्यांना म्हटले मला काय शिकायचे आहे? ते म्हणाले बघ त्यांनी लग्न केले, तू पण कर. मी वडिलांना म्हणालो की, त्यांनी ज्या वयात लग्न केले ते तुम्ही शिकायला पाहिजे.

थेट अरबाज खान याची खिल्ली उडवताना हर्ष गुजराल हा दिसला. खासगी आयुष्याबद्दल मजाक उडवण्यात आला तरीही अरबाज खान हा चिडताना दिसला नाही. आता हर्ष गुजराल याच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना नक्कीच दिसत आहे. अरबाज खान याच्या लग्नामध्ये अत्यंत जवळचे लोक हे उपस्थित होते. या निकाहातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.