हीना खाननं तिच्या दोन गाण्यांसह आणि सुंदर फोटोशूटसह सोशल मीडियावर पुनरागमन केलं आहे. पुन्हा एकदा हीना खानच्या किलर स्टाईलनं तिच्या चाहत्यांची मनं जिंकत आहे. यावेळी हीना ग्रीन कलरच्या वन शोल्डर ड्रेसमध्ये दिसली आहे.
आपल्या स्टाईल आणि सौंदर्यासाठी परिचित अभिनेत्री हीना खाननं पुन्हा एकदा तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे.
फोटोमध्ये हीना ग्रीन रफल वन शोल्डर ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये हीनाची खास हेअरस्टाईल आणि हेअर क्लिपही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या क्लिपवर लिहिलं आहे- 'सेक्सी'.
हीना खानने आपल्या करिअरची सुरूवात प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' पासून केली होती.
हीनानं आपल्या दमदार अभिनयामुळे टीव्हीच्या दुनियेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास केला आहे.