रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ बसून…, 11 वर्षाच्या मुलाचं निधन, लेकाच्या आठवणीत अभिनेता भावूक

| Updated on: Apr 30, 2024 | 9:06 AM

त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण जे व्हायचं तेच झालं... वयाच्या 11 व्या वर्षी मुलाने घेतला अखेरचा श्वास, भावूक होत अभिनेता म्हणाला, 'रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ बसून...', मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अभिनेत्याच्या पत्नीची देखील झाली होती वाईट अवस्था..

रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ बसून..., 11 वर्षाच्या मुलाचं निधन, लेकाच्या आठवणीत अभिनेता भावूक
Follow us on

आयुष्यात कधी कायम होईल सांगता येत नाही… अचानक अशी एक घटना घडते, ज्याचं दुःख आयुष्यभर सोबत घेऊन जगावं लागतं. अभिनेता शेखर सुमन याच्या आयुष्यात देखील असंच काही झालं आहे. शेखर सुमन सध्या ‘हिरामंडी’ वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मुलाच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं. मुलगा आयुष याच्या निधनाबद्दल सांगताना शेखर सुमन प्रचंड भावूक झाला आणि अभिनेता रडू लागला..

शेखर सुमन आणि त्याची पत्नी अल्का यांनी मुलाला तो फक्त 11 वर्षांचा असताना गमावलं. आयुष एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस (EMF) या गंभीर आजाराने त्रस्त होता. एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस हृदयासंबंधी एक आजार आहे. जो नवजात बालक आणि लहान मुलांमध्ये आढळतो. अभिनेता म्हणाला, ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस फार दुर्मिळ आजार आहे. जो असंख्य लोकांमध्ये एकाला असतो…’

‘माझ्या माहितीनुसार भारतात तीन – चार लहान मुलं एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस या गंभीर आजाराचा सामना करत असतील. या आजारावर कोणते उपचार नाहीत. एकच उपाय आहे तो म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट… जेव्हा आयुष याच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तो फक्त 8 महिने जगू शकेल. जास्त काळ आयुष जगू शकणार नाही…’

हे सुद्धा वाचा

‘आयुष याचे आजोबा पानी भूषण प्रसाद स्वतः एक हाय प्रोफाईल डॉक्टर होते. तरी देखील आयुष याचे प्राण वाचले नाहीत. तेव्हा आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. जगभरातील सर्व डॉक्टरांकडे आम्ही गेलो. आयुष याच्यावर उपचार केले, आध्यात्माकडे वळलो… दिवस – रात्र प्रार्थना करत होतो. पण नशिबात जे लिहिलेलं आहे तेच होणार.’

मुलाचे शेवटचे क्षण आठवत अभिनेता म्हणाला, ‘अखेर तो दिवस आलाच… आम्ही आयुष याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे. तेव्हा मी रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ पडून होतो… पूर्ण दिवस रडत होतो. अल्का देखील प्रचंड रडली.. अखेर आम्ही स्वतःला सावरलं..’

आपल्या डोळ्यासमोर मुलाला शेवटचा निरोप देणं फार कठीण असतं… मुलाला अग्नीच्या स्वाधीन करण्यापेक्षा मोठे दुःख कोणतं असू शकतं? वेळेनुसार मनावरचे घाव भरले… पण मनात असलेलं दुःख अधिक वाढलं… असं देखील अभिनेता म्हणाला… सध्या सर्वत्र अभिनेत्याने व्यक्त केलेल्या दुःखाची आणि त्याच्या मुलाच्या निधनाची चर्चा रंगली आहे.