गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त ‘हीरामंडी’ वेब सीरिजची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना सीरिजला संमिश्र मिळत आहे. पण सीरिजमधील अभिनेत्री त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री संजीदा शेख हिने हैराण करणारा खुलासा केला आहे. पबमध्ये अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घटना घडली, ज्याबद्दल अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजीदा हिची चर्चा रंगली आहे.
एका मुलाखतीत संजीदा हिने नाईट क्लबमध्ये घडलेली धक्कादायक घटना सांगितली. क्लबमध्ये कोणत्या मुलाने नाहीतर, मुलीने संजीदा हिला वाईट प्रकारे स्पर्श केलं होतं. ‘माझ्यासोबत घडलेली एक घडना मला आजही आठवत आहे. ते कृत्य एका मुलीने केलं होतं.’
‘मी एका नाईट क्लबमध्ये होती. माझ्या बाजूने एक मुलगी जात होती. तिने माझ्या स्तनांना स्पर्श केला. मी हैराण झाली माझ्यासोबत काय झालं मला काही काळ कळलं नाही. आपण ऐकतो एक पुरुष तुमच्यासोबत असं वाईट कृत्य करतो. पण मुली देखील काही कमी नाही…’
‘जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तर, तुम्ही कोणतीच पर्वा करत नाहीत. याचा पुरुष आणि महिला असा काहीही संबंध नसतो. जे काही चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. जर कोणती महिला तुमच्यासोबत वाईट कृत्य करत असेल तर सांगा. कारण पीडित असल्याचा देखावा करण्यात काहीही अर्थ नाही…’ असं देखील संजीदा मुलाखतीत म्हणाली.
अभिनेत्री संजीदा शेख हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ सिनेमातून अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. त्यानंतर संजीदा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
संजीदा हिने फक्त हिंदी कलाविश्वातच नाहीतर, तामिळ, कन्नड, पंजाबी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. शिवाय संजीदा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘क्या होगा निम्मो का’, ‘कयामत’, ‘क्या दिल में है’, ‘पिया का घर प्यारा लगे’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
संजीदा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत अशते. घटस्फोटानंतर अभिनेत्री सिंगल मदर म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे. अभिनेत्री मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.