बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनेत्री धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना हेमा मालिनी यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत देखील हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली. हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी राम कमल मुखर्जी यांनी लिहिल्या आहेत. ‘हेमा: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याचा खुलासा करण्यात आला आहे.
सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली. पण तेव्हा धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. दोघांचं नातं हेमा मालिनी यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. म्हणून अभिनेत्रीच्या आई – वडिलांनी जितेंद्र यांच्यासोबत हेमा मालिनी याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1974 मध्ये हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे कुटुंब दोघांच्या लग्नासाठी भेटले होते.
पण हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी जितेंद्र तयार नव्हते. जितेंद्र यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितलं होतं, ‘मला हेमा सोबत लग्न करायचं नाही. मी त्यांच्यावर प्रेम करत नाही. त्यांचं देखील माझ्यावर प्रेम नाही… पण कुटुंबियांचा निर्णय आहे.. हेमा एक चांगली मुलगी आहे…’
जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न होणार… ही बातमी बॉलिवूडमध्ये सर्वत्र पसरली… अशात दोघांच्या लग्नाच्या दिवशी दारुच्या नशेत धर्मेंद्र लग्न मंडपात पोहोचले. धर्मेंद्र यांना पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांचे वडील भडकले आणि म्हणाले, ‘तू विवाहित पुरुष आहेस, तुला चार मुलं आहेत… तू माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही…’ त्यानंतर जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न मोडलं.
लग्नाच्या दिवशीच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न मोडलं. पण दोघांनी कधीच मतभेद ठेवले नाहीत. एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘माझ्या मनात मी कधीच कोणाबद्दल राग ठेवत नाही आणि असं करु देखील नये… विसरुन सर्व गोष्टींना माफ करता यायला हवं…’ सांगायचं झालं तर, जितेंद्र यांच्यासोबत लग्न मोडल्यानंतर देखील दोघांनी सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली.