Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, हेमा मालिनी यांनी सांगितलं सत्य

| Updated on: Sep 13, 2023 | 12:18 PM

Dharmendra | धर्मेंद्र यांना नक्की काय झालं आहे? पतीच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी यांनी सांगितलं सत्य, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण... सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चर्चा...

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर,  हेमा मालिनी यांनी सांगितलं सत्य
Follow us on

मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेते धर्मेंद्र (dharmendra) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. अभिनेते सनी देओल (Sunny Deol) स्टारर ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. देओल कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असताना, सनी देओल वडील धर्मेंद्र यांनी अमेरिकेत उपचारासाठी घेवून गेल्याची चर्चा जोर धरत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण असताना धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पतीच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चर्चा रंगत आहेत.

रिपोर्टनुसार, सनी देओल वडील धर्मेंद्र यांनी उपचारासाठी दोन आठवडे अमेरिकेत घेवून गेले आहे. रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असल्याची चर्चा रंगत आहे. रंगणाऱ्या सर्व चर्चांना आता हेमा मालिनी यांनी पूर्ण विराम दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करताना चाहते दिसत आहेत.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची अपडेट देत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मंद्र यांची प्रकृती स्थीर आहेत. ते रुटीन आरोग्य तपासणीसाठी अमेरिका याठिकाणी गेले आहेत. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही…’ सनी देओल यांची बहीण अमेरिकेत राहते म्हणून देखील धर्मेंद्र आणि सनी देओल परदेशात गेल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

धर्मेंद्र यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा मी हेमा मालिनी यांना भेटत नाही तेव्हा मला अस्वस्थ वाटतं. माझ्या आरोग्याबाबतच्या रिपोर्टमुळे माझ्या आजूबाजूचे लोक सतत काळजी करतात. माझ्या प्रकृतीबद्दल काही लिहू नका, अशी विनंती मी कायम माझ्या माध्यमांतील मित्रांना करत असतो..’ असं देखील धर्मेंद्र म्हणाले होते.

धर्मेंद्र यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिवाय नुकताच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे धर्मेंद्र चर्चेत आले. सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र कायम सक्रिय असतात.