मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘बागबान’, ‘ड्रीम गर्ल’, ‘नसीब’, ‘क्रांती’, ‘सत्ते पर सत्ता’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहते हेमा मालिनी यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहतात. पण गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या हेमा मालिनी यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा रंगत आहे. हेमा मालिनी यांनी कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण काही अटी-शर्तींवर त्यांनी ठेवल्या आहेत…
नुकताच झालेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे हेमा मालिनी चर्चेत आल्या आहेत. हेमा मालिनी म्हणाल्या, ‘कोणी माझ्याकडे चांगली भूमिका घेवून येईल याच प्रतीक्षेत मी आहे. सिनेमांमध्ये कमबॅक करण्याची माझी इच्छा आहे. पण भूमिका माझ्या वयाला शोभणारी आणि चांगली असवी…’
‘भूमिका ग्लॅमरस असली तरी काही हरकत नाही, पण माझ्या वयाचा खास विचार करायला हवा. तेव्हाच मी सिनेमा साईन करेल.. मला नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर यायचं नाही. मी कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. त्यामुळे मी नकारात्मक भूमिक का करू…’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘कोणतीही भूमिका मी साकारू शकते. पण भूमिका सकारात्मक असायला हवी.. ज्यामुळे लोकांपर्यंत मी चांगला संदेश पोहचवू शकेल..’ एवढंच नाही तर, ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ सिनेमात अभिनेते धर्मेंद्र यांनी अभिनेत्री शबाना आजमी यांच्यासोबत दिलेले किसिंग सीनवर देखील मौन सोडलं आहे.
धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी त्यांचा किसिंग सीन पाहिलेला नाही. पण चाहत्यांना त्यांची भूमिका आवडली आहे. हे मला ठाऊक आहे.. धर्मेंद्र यांच्यासाठी मी आनंदी आहे. कारण त्यांना कॅमेऱ्यासमोर रहायला आवडतं. घरी देखील ते कायम स्वतःचे व्हिडीओ पाहत असतात.. ‘ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. विवाहित असताना देखील धर्मेंद्र यांनी सर्व मर्यादा मोडत हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४३ वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही.