मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : आजच्या घडीला सेलिब्रिटी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. पण पूर्वीचे सेलिब्रिटी फक्त हजार रुपयांमध्ये सिनेमांमध्ये काम करायचे. जवळपास तीन वर्षांपूर्वीपासून सेलिब्रिटी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेतात. आता सेलिब्रिटींचं मानधन दिवसागणिक वाढत आहे. आजच्या घडीला सेलिब्रिटी एका सिनेमासाठी 100 कोटी मानधन घेतात. पण भारतातील एक अभिनेता असा आहे, जो एका मिनिटासाठी कोट्यवधी रुपये घेतो. तुम्हाला वाटलं असले शाहरुख खान, सलमान खान यांच्याशिवाय दुसरा कोणत्याच अभिनेत्याला इतकं मानधन मिळत नसेल. भारतातील सर्वात महागडा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता अजय देवगन आहे.
कमाईच्या बाबतीत आमिर खान, शाहरुख खान, प्रभास, रजनीकांत, सलमान खान आणि थलपथी विजय यांसारख्या सेलिब्रिटींची नावे यादीत अव्वल आहेत. या सर्व सेलिब्रिटींची कमाई प्रत्येक सिनेमातून 100 कोटींपेक्षा अधिक आहे. काहींनी त्यांच्या सर्वात हिट सिनेमांमधून नफा वाटून 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
सांगायचं झालं तर, सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना देखील अजय याने मागे टाकलं आहे. अजय देवगन याने एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती. ज्यासाठी अभिनेत्याने 35 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. सिनेमात अभिनेत्याने फक्त 8 मिनिटांची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्याने एका मिनिसाठी तब्बल 4.5 कोटी मानधन घेतलं होतं.
अजय देवगन एका फ्लॅशबॅक सीनमध्ये श्रिया सरनसोबत RRR मध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता. या बिग बजेट सिनेमासाठी अजयला मोठी रक्कम मिळाली. सांगायचं झालं तर, सिनेमासाठी अजय देवगन याची फी 35 कोटी रुपये आहे. सिनेमात अभिनेत्याची मुख्य भुमिका असेल तर कमाईतील 50 टक्के भाग अजय याचा असतो. ‘दृष्यम 2’ सारख्या सिनेमामध्ये अभिनेत्याने 100 कोटी रुपये मानधन घेतल्याची देखील माहिती समोर आली.
अजय देवगन याचे आगामी सिनेमे
अजय देवगन लवकरच सिंघम अगेन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अजय देवगन याच्यासोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.