Himesh Reshammiya | सख्ख्या भावाचं निधन अन् वडिलांची एक अपुरी इच्छा; अशा प्रकारे हिमेश रेशमियाँ बनला स्टार

| Updated on: Jul 23, 2023 | 11:05 AM

कहीं प्यार ना हो जाए, तेरे नाम, ये है जलवा, दिल ने जिसे अपना कहा, क्योंकी, मैंने प्यार क्यों किया, बॉडीगार्ड, किक, प्रेम रतन धन पायो, राधे आणि किसी का भाई किसी की जान यांसारख्या सलमानच्या चित्रपटांना हिमेशनेच सुपरहिट गाणी दिली आहेत.

Himesh Reshammiya | सख्ख्या भावाचं निधन अन् वडिलांची एक अपुरी इच्छा; अशा प्रकारे हिमेश रेशमियाँ बनला स्टार
Himesh Reshammiya
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 23 जुलै 2023 : गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाँ हे नाव एकेकाळी इतकं प्रसिद्ध झालं होतं की प्रत्येक चित्रपटात त्याचीच गाणी गाजत होती. प्रत्येक रिॲलिटी शोजमध्ये हिमेशला आवर्जून आमंत्रित केलं जात होतं. त्याच्या गाण्याच्या स्टाइलवरून बरेच विनोदी व्हिडीओसुद्धा व्हायरल व्हायचे. अनेकदा हिमेशला त्याच्या स्टाइलमुळे ट्रोल व्हावं लागलं होतं. मात्र त्याच स्टाइलमुळे त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला होता. हिमेश रेशमियाँचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजरातमधील भावनगरमध्ये झाला. आज हिमेश त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिमेशचे वडीलसुद्धा संगीतकार होते.

हिमेशला एक मोठा भाऊसुद्धा होता. आपल्याप्रमाणेच मुलानेदेखील संगीतकार व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र हिमेशच्या भावाचं वयाच्या 11 व्या वर्षीच निधन झालं. वडिलांची इच्छा अखेर हिमेशने पूर्ण केली आणि संगीतविश्वात आपलं नाव कमावलं. हिमेशच्या वडिलांना एक चित्रपट बनवायचा होता आणि त्यात त्यांना सलमान खानला मुख्य भूमिका साकारताना पहायचं होतं. याच चित्रपटातून ते हिमेशला लाँच करणार होते. मात्र असं होऊ शकलं नाही. मात्र सलमानने जेव्हा हिमेशचं काम पाहिलं, तेव्हा तो प्रभावित झाला.

हे सुद्धा वाचा

हिमेशने 1998 मध्ये सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दोघांनी अनेकदा एकत्र काम केलं. सलमानच्या बऱ्याच चित्रपटांसाठी हिमेशने संगीत दिलं आणि त्याची गाणी तुफान हिट झाली. बंधन, हॅलो ब्रदर यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. सलमानच्या ‘दुल्हन हम ले जाएंगे’ या चित्रपटातून हिमेशने सोलो डेब्यु केलं होतं आणि याच चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली.

हिमेशला अभिनेता इमरान हाश्मीचा आवाज म्हणून ओळखलं जायचं आणि दोघांनी एकत्र अनेकदा परफॉर्मन्सेस दिले. मात्र सलमान आणि हिमेशची मैत्री खूप खास आहे. कहीं प्यार ना हो जाए, तेरे नाम, ये है जलवा, दिल ने जिसे अपना कहा, क्योंकी, मैंने प्यार क्यों किया, बॉडीगार्ड, किक, प्रेम रतन धन पायो, राधे आणि किसी का भाई किसी की जान यांसारख्या सलमानच्या चित्रपटांना हिमेशनेच सुपरहिट गाणी दिली आहेत.