‘आताच उमराह केला अन् आता मंदिरात..’; सिद्धिविनायक मंदिरात गेल्याने हिना खान ट्रोल

| Updated on: Jan 14, 2025 | 2:14 PM

अभिनेत्री हिना खानने नुकतंच सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. मुस्लीम असून मंदिरात का, असा सवाल काहींनी केला आहे.

आताच उमराह केला अन् आता मंदिरात..; सिद्धिविनायक मंदिरात गेल्याने हिना खान ट्रोल
Hina Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करतेय. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं असून ती अत्यंत धैर्याने उपचारांना सामोरी जातेय. सोशल मीडियावर ती तिच्या आरोग्याचे सतत अपडेट्स देत असते. यादरम्यान नुकतंच तिने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. मंदिराबाहेर तिची भेट अभिनेते चंकी पांडे यांच्याशी झाली. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या फोटोंवरून काही नेटकऱ्यांनी हिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिना तिच्या आगामी ‘गृहलक्ष्मी’ या वेब सीरिजचं प्रमोशन करतेय. यामध्ये तिच्यासोबत चंकी पांडे, राहुल देव आणि दिब्येंदु भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत. येत्या 16 जानेवारीला ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहेत. या सीरिजमध्ये हिना लक्ष्मीच्या तर चंकी पांडे हे करीम काजीच्या भूमिकेत आहेत. तर राहुल देवने टोकस आणि दिब्येंदुने विक्रमची भूमिका साकारली आहे. रुमान किदवईने या सीरिजचं दिग्दर्शन केलंय. या सीरिजनिमित्त त्यातील कलाकारांसोबत हिना खानने सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं.

हे सुद्धा वाचा

गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर हिनाने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. यावेळी तिने ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोषही केला. हिनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलंय. ततर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. ‘आताच उमराह केला आणि आता मंदिरात पोहोचली. अल्लाह तिला माफ करो’, असं एकाने लिहिलं. तर ‘हिना खान मुस्लीम असून मंदिरात कशी जाऊ शकते’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘एका तरी धर्माचं चांगल्या प्रकारे पालन कर. अल्लाहला घाबर’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हिना हळूहळू कर्करोगातून बरी होत आहे. सर्जरीनंतर तिच्यावर किमोथेरेपी करण्यात आली. पहिल्या किमोनंतर हिनाच्या शरीरावर काही डागसुद्धा दिसून आले होते. याविषयी नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. मात्र सकारात्मक विचार डोक्यात ठेवून या सर्व गोष्टींना सामोरं जात असल्याचं हिनाने चाहत्यांना सांगितलं तेव्हा तिच्या धैर्याचं कौतुक अनेकांनी केलं. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हिनाला पाहून तिची आई भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं होतं.