मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने (shweta tiwari) एका कार्यक्रमादरम्यान ‘माझ्या ‘ब्रा’ ची साईज देव घेऊन जातोय’, असं विधान केलं आणि त्यावरून सध्या जोरदार वाद रंगलाय. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा (MP Home Minister Dr. Narottam Mishra) यांनी तर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
श्वेता तिवारीचं वादग्रस्त विधान काय आहे?
एका प्रमोशनसाठी श्वेता भोपाळमध्ये गेली होती. या प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान श्वेता म्हणाली की, ‘माझ्या ‘ब्रा’ची साईज देव घेऊन जातोय’. तिच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे विधान गंभीर असल्याचं म्हटलंय. तिच्या या विधानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Actress Shweta Tiwari made a controversial statement on God.. It happens in the press conference of #ShowStopper Webseries..#ShwetaTiwari @rohitroy500@DiganganaS #ControversialStatement #Trending #TrendingNow #ottplatform pic.twitter.com/EqmsibDoy4
— Deep Singh (@Deepsingh_page3) January 26, 2022
मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचा इशारा दिलाय. ‘श्वेताचं हे विधान मी ऐकलंय, पाहिलंय. तिचं हे विधान निंदनीय आहे’ असं ते म्हणालेत. तसंच ‘मी या प्रकरणी भोपाळच्या पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्या रिपोर्टची एक कॉपी मला द्या आणि नंतरच कारवाई करा’, असे आदेश दिल्याचंही नरोत्तम मिश्रा म्हणाले.
श्वेता तिवारी हिंदी टीव्हीतील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही तिची मालिका विशेष गाजली. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. पण सध्या या विधानामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
संबंधित बातम्या