‘होळी छपरी लोकांचा…’, फराह खानच्या वक्तव्यावर हिंदुस्थानी भाऊचा संताप, प्रकरण पोहोतलं पोलीस स्थानकात

| Updated on: Feb 23, 2025 | 12:42 PM

Hindustani Bhau - Farah Khan: 'होळी छपरी लोकांचा...', हिंदू सणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं फराह खानला पडलं महागात, हिंदुस्थानी भाऊकडून संताप व्यक्त, प्रकरण पोहोतलं पोलीस स्थानकात

होळी छपरी लोकांचा..., फराह खानच्या वक्तव्यावर हिंदुस्थानी भाऊचा संताप, प्रकरण पोहोतलं पोलीस स्थानकात
Follow us on

Hindustani Bhau – Farah Khan: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान विरोधात खार पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. फराह खानने होळी या हिंदू सणाला छपरी सण म्हटल्यामुळे वादग्रस्त परिस्थीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फराह खान हिच्या विरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात येत आहे. हिंदुस्तानी भाऊ याने फराह विरोधात तक्रार दाखल केली आहे.

फराह खान हिच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत हिंदुस्ताना भाऊ म्हणाला, ‘एकदा फराह खानने होळीच्या सणाला वृंदावनला भेट दिली पाहिजे तेव्हा तिला समजेल की होळी कोणता महान सण आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर होळी जो सण आहे तो छपरी लोकांचा आहे… असं फराह म्हणाली आहे.

पुढे हिंदुस्तानी भाऊ म्हणाली, ‘आपल्याला सनातन धर्माबद्दल माहिती नाही कां सनातन धर्माचा अपमान करता… पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आपल्या सनातन धर्माचा मान राखतात… बॉलीवूड प्रत्येक वेळी हिंदू धर्माचा अपमान करतो… यांना कोणी काही बोलू शकतं नाही कारण पैसा असतो पॉवर असते. मी खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे… आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

हिंदुस्थानी भाऊने फराहविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली असून, फराहवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणावर हिंदुस्थानी भाऊचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी देखील प्रतिक्रियादिली आहे.

हिंदुस्थानी भाऊचे वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले, “माझ्या क्लायंटचा असा विश्वास आहे की फराह खानची टिप्पणी केवळ अपमानास्पद नाही तर धार्मिक भावना दुखावणारी आहे. एखाद्या पवित्र सणाचं वर्णन करण्यासाठी ‘छपरी’ शब्द वापरणंअत्यंत अयोग्य आहे.

गेल्या गुरुवारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फराह खान म्हणते की, होळी छपरी लोकांचा सण आहे. तिच्या या वक्तव्याचा लोक निषेध करत आहेत.