Aishwarya Rai viral video: जगातील सर्वांत सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. आज ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ऐश्वऱ्या हिच्या सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर, बॉलिवूड, हॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. सध्या ऐश्वर्या हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीसोबत एक हॉलिवूड सेलिब्रिटी फ्लर्ट करताना दिसत आहे. ऐश्वर्या हिच्यासोबत सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही, हॉलिवड अभिनेता ह्यू जॅकमॅन आहे.
एकदा ह्यू जॅकमॅन त्याची पत्नी Deborra-Lee Furness हिच्यासोबत भारतात आला होता. तेव्हा ह्यू जॅकमॅन पूर्णपणे ऐश्वर्या हिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. एवढंच नाही तर, तो ऐश्वर्यासोबत फ्लर्ट देखील करु लागला होता. सध्या सोशल मीडियावर ह्यू जॅकमॅन आणि ऐश्वर्या राय यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.
सांगायचं झालं तर, व्हिडीओ 2011 मधील आहे. जेव्हा ‘डेडपूल एन्ड वुल्वरीन’ स्टारर अभिनेता ह्यू जॅकमॅन त्याच्या पत्नीसोबत ऐश्वर्या हिच्यासोबत फ्लर्ट करु लागला होता. तेव्हा ऐश्वर्या राय आणि दिवंत फिल्ममेकर यश चोप्रा यांनी गणपतीची मुर्ती ह्यू जॅकमॅन याला दिली होती. ऐश्वर्या हिने गणपतीची मुर्ती ह्यू जॅकमॅन याला दिल्यानंतर अभिनेत्याने फ्लर्ट करणं सुरु केलं.
ह्यू जॅकमॅन, ऐश्वर्या हिला म्हणाला, ‘धन्यवाद ऐश… मला सांगण्यात आलं होतं की जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रीसोबत तुझी ओळख करुन दिली जाईल. मला वाटलं माझी पत्नी असेल… माझी पत्नी समोरच्या लाईनीत बसली आहे. त्यामुळे मी असं म्हणत आहे… मी प्रचंड हूशार माणूस आहे…’
पुढे ह्यू जॅकमॅन म्हणाला, ‘ऐश… तू खरंच खूप सुंदर आहेस… सुंदर अभिनेत्री आहेस… भारतात, मुंबईत येण्यासाठी मी उत्सुक होतो… माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे…’, असं देखील ह्यू जॅकमॅन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, ह्यू जॅकमॅन आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे.