मुंबई : हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. हॅरी पॉटर (Harry Potter) या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटामध्ये रुबियस हॅग्रिडची जबरदस्त भूमिका साकारणारा सर्वांचा आवडता अभिनेता रॉबी कोलट्रेन (Robbie Coltrane) यांचे शुक्रवारी निधन झालंय. रॉबी कोलट्रेन यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. 72 व्या वर्षी रॉबी यांनी शेवटचा श्वास घेतला. हॅरी पॉटर चित्रपटापासून (Movie) रॉबी कोलट्रेन यांचे भारतामध्येही खूप फॅन होते. मुळात म्हणजे रॉबी कोलट्रेन यांची मोठी फॅन फाॅलोइंग आहे. रॉबी यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोकाकुल आहे.
रॉबी कोलट्रेन यांनी सुरूवातीपासूनच आयुष्यात खूप संघर्ष केला. रॉबी यांचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन होते. इंडस्ट्रीत सारखेच अपयश मिळत असल्याने रॉबी यांनी स्टँड-अप कॉमेडी करण्यासही सुरूवात केली होती. हॅरी पॉटर चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाला पुरस्कार देखील मिळाला होता. रॉबी यांना खरी ओळख हॅरी पॉटरमुळेच मिळाली. हॅरी पॉटरमधील त्यांचे पात्र आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे.
सुरूवातीच्या काळात रॉबी कोलट्रेन यांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. मग त्यांनी टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केली. मात्र, त्यामध्येही अनेक चढउतार बघायला मिळाले. काही दिवस त्यांनी स्टँड-अप कॉमेडीयन म्हणूनही काम केले. द कॉमिक स्ट्रिप आणि ए किक अप द एट्स या कॉमेडी शोमध्येही रॉबी कोलट्रेन यांनी जबरदस्त अभिनय करत लोकांना खळखळून हसवले.