मुंबई | 31 जुलै 2023 : प्रसिद्ध गायक आणि रॅपर कार्डी बी (Cardi B) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. संपूर्ण जगभरात कार्डी बी हिच्या गाण्यांची चर्चा रंगत असते. पण आता कार्डी बी तिच्या गाण्यांमुळे नाही तर एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या कार्डी बीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान कार्डी बी हिच्यासोबत असं काही झालं ज्यामुळे गायिका तुफान चर्चेत आली आहे. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान एका चाहत्याने कार्डी बी हिच्या अंगावर ड्रिंक फेकलं. यामुळे संतप्त झालेल्या रॅपरने चाहत्यावर माईक फेकून दिला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये एक चाहता कार्डी बी हिच्या अंगावर ड्रिंक फेकतो. चाहत्यांने ड्रिंक फेकल्यानंतर संतापलेल्या गायिकेने चाहत्यावर माईक फेकून मारला. चाहत्याचं गैरवर्तन लक्षात घेत सुरक्षा रक्षकांनी देखील त्या व्यक्तीला कॉन्सर्टमधून बाहेर केलं. व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या फक्त आणि फक्त कार्डी बी हिच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही नेटकरी गायिकेचं समर्थन करत आहेत, तर अनेक काही लोक तिच्या रागामुळे तिला ट्रोल करत आहेत. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कार्डी तिच्या बोडक यलो या हिट गाण्यावर परफॉर्म करत असताना असा धक्कादायक प्रकार घडला.
Cardi B was performing in Las Vegas and someone threw a drink at her! Check it out !!! #cardib pic.twitter.com/zCldoWBhes
— Eric Remy (@deejremy) July 30, 2023
कार्डी केशरी रंगाचा ड्रेस घालून स्टेजवर चालत गाणं गात प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. तेव्हा एका चाहत्याने तिच्यावर ड्रिंक फेकलं. कार्डी बीच्या आधी आणखी एका स्टारसोबत असे कृत्य घडले आहे. गायक हॅरी स्टाइल्सच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अशी घटना घडली होती. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं होतं.
हॉलिवूड गायक कार्डी बी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, कार्डी प्रसिद्ध गायक आणि रॅपर आहे. तिला फोर्ब्सने सर्वात प्रभावशाली महिला रॅपर्सपैकी एक म्हणून गौरवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे Spotify अब्ज-स्ट्रीमर्स असलेली ती एकमेव महिला रॅपर आहे. कार्डी बी हिने ग्रॅमी पुरस्कार, 8 बिलबोर्ड म्यूझिक पुरस्कार, 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, 4 अमेरिकन म्यूझिक पुरस्कार, 11 BET हिप हॉप पुरस्कार आणि 2 एएससीएपी गीतकार ऑफ द इयर यांसारख्या पुरस्कारांवर गायिकेने स्वतःचं नाव कोरलं आहे.