प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याने पत्नी शालिनी तलवारला (Shalini Talwar) घटस्फोट दिला. गेल्या काही दिवसांपासून हनी सिंगच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. 2023 मध्ये हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला. पण यावर हनी कधीच काहीही बोलला नाही. आता हनी सिंग याने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘घटस्फोटानंतर माझी प्रकृती सुधारली आहे…’ असं वक्तव्य देखील हनी सिंग याने केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल हनी सिंग म्हणाला, ‘माझी प्रकृती खालावली होती. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. माझी औषधं कमी झाली आणि माझी लक्षणं थांबली.’ असं देखील हनी सिंग म्हणाला.
पुढे हनी सिंग म्हणाला, ‘घटस्फोटानंतर माझी प्रकृती स्थिर होत होती. सात वर्षांनंतर मी पहिल्यांदा जग वेगळ्या नजरेने पाहात आहे… असं मला वाटत होतं.’ सांगायचं झालं तर, हनी सिंग याच्या घटस्फोटाबद्दल कोणाला काहीही माहिती नव्हतं. पण जेव्हा घटस्फोटाची माहिती समोर आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला.
हनी सिंग याने याआधी देखील खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘9 – 10 महिने आमच्या आयुष्यात सर्वकाही ठिक होतं. पण करियरमध्ये प्रगती होत गेली, तेव्हा मी प्रसिद्धी, पैसा आणि नशेच्या आहारी गेलो… ज्यामुळे शालिनी आणि माझ्यात वाद होऊ लागले. त्यामुळे आमच्यामध्ये सतत वाद होऊ लागले. 2022 – 23 मध्ये आमचा घटस्फोट झाला…’ असं देखील हनी सिंग म्हणाला होता.
हनी सिंग याच्या आगामी अल्बमबद्दल सांगायचं झालं तर, हनी सिंग सध्या ‘ग्लोरी’ अल्बममुळे चर्चेत आहे. चाहते हनी सिंगच्या आगामी गाण्याच्या प्रतीक्षेत आहे. हनी सिंग याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, त्याने 2000 मध्ये संगीत विश्वात पदार्पण केलं. “अंग्रेजी बीट” गाण्यामुळे हनी सिंग याला नवीन ओळख मिळाली.
“अंग्रेजी बीट” गाणं प्रसिद्ध आणि लोकांच्या पसंतीस उतरल्यानंतर हनी सिंगने कधीच मागे वळून पाहिलं नाही. “ब्राउन रंग”, आणि “लुंगी डांस” यांसारख्या गाण्यांमुळे हनी सिंग एका रात्रीत स्टार झाला. चाहत्यांनी देखील हनी सिंग याला डोक्यावर घेतलं. सध्या सर्वत्र हनी सिंग याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.