हनी सिंह याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे हनी सिंह याचे गाणे कायमच फेमस होतात. लूंगी डान्ससारखे जबरदस्त गाणे त्याने बॉलिवूडला दिली आहेत. हनी सिंह गेल्या काही वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होता. एक वेळ अशी होती की, हनी सिंह आयुष्यात काय करतोय हे कोणालाही माहिती नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्याने परत एकदा दमदार पद्धतीने पुनरागमन केले आहे. हनी सिंह हा पूर्णपणे नशेत होता. दिवसरात्र तो फक्त आणि फक्त नशा करत होता. आपल्या आजूबाजुला काय सुरू आहे हे देखील त्याला त्यावेळी कळत नव्हते. हनी सिंह याने त्याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा देखील केला होता.
नुकताच आता हनी सिंह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्याने मोठे खुलासे केले. हनी सिंह म्हणाला की, मी सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नासाठी मुंबईमध्ये पोहोचलो होतो. त्याच्या अगोदर मी एक वर्ष दारू अजिबात पिलो नव्हतो. कारण मला काही दिवसांपूर्वी फक्त दारूच नाही तर त्यासोबतच अनेक नशिले पदार्थ घेण्याची सवय लागली होती.
मला काहीच कळत नव्हते, त्यानंतर मी खूप मेहनतीने त्यामधून बाहेर पडलो आणि दारू पण सोडली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या पार्टीला गेलो, तिथे सर्वजण जमले होते. मी दारू सोडली होती. पण सोनाक्षीच्या लग्नाच्या स्टेजवर जाण्याच्या अगोदर मी अर्धी बॉटल दारू पिली आणि तेथील वातावरणच माझ्या गाण्याने बदलून टाकले.
मी सोनाक्षीच्या लग्नाच्या पार्टीत खूप दारू पिलो. ज्यावेळी मी पिऊन बाहेर आलो, त्यावेळी तिथे पापाराझी देखील उपस्थित होते. पापाराझी यांनी मला दारूच्या नशेत बघितले. पुढे हनी सिंह म्हणाला की, मुळात म्हणजे दारू पिल्यानंतर मला काहीच कळत नाही. त्यामध्येच मी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या पार्टीत पिलो.
हनी सिंह याने सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात तब्बल एक वर्षानंतर दारू पिली. हनी सिंह याने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा केला. हनी सिंह याने भारतात न राहण्याचे थेट कारणच सांगून टाकले. जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानेच आपण भारतात राहत नसल्याचे हनी सिंह याच्याकडून सांगण्यात आले. सिद्धू मुसेवाला याची हत्या केलेल्या टोळीकडूनच आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे हनी सिंह याने म्हटले आहे.