Sonakshi Zaheer : चांगलं नाही ठेवलं तर…, दारूच्या नशेत हनी सिंगने दिली सोनाक्षीच्या नवऱ्याला धमकी

| Updated on: Jun 24, 2024 | 3:56 PM

Sonakshi Zaheer Reception: दारूच्या नशेत हनी सिंगने दिली सोनाक्षीच्या नवऱ्याला धमकी, 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा...

Sonakshi Zaheer : चांगलं नाही ठेवलं तर..., दारूच्या नशेत हनी सिंगने दिली सोनाक्षीच्या नवऱ्याला धमकी
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी मुंबईत कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीरनेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाक्षी आणि झहीर यांचं लग्न फार मोठ्या शाही थाटात नाही झालं. पण सोनाक्षी आणि झहीर यांच्या रिसेप्शन पार्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये रॅपर हनी सिंग देखील उपस्थित होता. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हनी सिंग नशेत सोनाक्षी हिच्या नवऱ्याला धमकी देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, पापाराझींना पाहिल्यानंतर हनी सिंग धावत त्यांच्याकडे आला. विनोदी अंदाजात हनी सिंग याने एका क्लोदिंग ब्रँडचं नाव घेत त्या ब्रँडचे कपडे न वापरण्याचा सल्ला पापाराझींना दिला.

 

 

पुढे हनी सिंग दारूच्या नशेत झहीर याला धमकी देताना देखील दिसला. पापाराझी हनी सिंगला विचारतात, ‘दारू प्यायली आहे का?’ यावर हनी सिंग म्हणतो, ‘मी गेल्या दीड वर्षांपासून दारू प्यायलो नाही. पण आज मी खूप दारु प्यायली आहे. हा व्हिडीओ माझ्या आईने पाहिल्यानंतर मला ती ओरडेल. पण मी खूप दारू प्यायली आहे…’

‘मी आज आनंदी आहे, माझ्या खास मैत्रिणीचं लग्न आहे. तिच्या आयुष्यात झहीर.. चांगला मुलगा आला आहे. झहीर खूप चांगला आहे. मी त्याला तीन वर्षांपूर्वी भेटलो होतो. तो सोनाक्षीला कायम आनंदी ठेवेल अशी आशा करतो… चांगलं नाही ठेवलं तर बघून घेऊ…’ अशी विनोदी अंदाजात धमकी देखील हनी सिंग याने दिली आहे.

सोनाक्षी – झहीर यांची रिसेप्शन पार्टी

सोनाक्षी आणि झहीर यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक जवळच्या मित्रांनी त्यांच्या हजेरी लावली होती. डीजे गणेशने आधीच सांगितले होते की या रिसेप्शनसाठी सुमारे 1000 लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये काजोल, रावीना टंडन, सलमान खान, संजय लीला भन्साळी, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी साकिब सलीम असे अनेकजण दिसले.