बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. वयाच्या 48 व्या वर्षीही ती किती फिट आहे हे तुम्ही पाहिलं असेल. पंरतू ती तरुण दिसण्यामागे तिचा डाएट आणि वर्कआऊट खूप महत्त्वाच आहे. मलायका फिटनेससाठी कठोर परिश्रम घेते. ती कधीही वर्कआऊट चुकवत नाही. मलाइकाची फिटनेस दिनचर्येमध्ये योगा, जिम वर्कआउट आणि कार्डिओचा समावेश आहे. तिने इंस्टाग्रामवर तिच्या संपूर्ण आठवड्याच्या वर्कआउट रूटीनचा व्हिडिओ देखील शेअर केला होता, जो तिच्या चाहत्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे.
मलायका तिच्या आठवड्याची सुरुवात योगाने करते. ट्रेडमिलवर धावते. कॅलरी बर्न करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मलायका असे मानते की फिटनेसमध्ये संतुलन खूप महत्वाचे आहे. तिच्या व्हिडिओच्या ती म्हणते की, “कोण म्हणतो की जिमर्स योगी असू शकत नाहीत? माझा योग आणि जिमच्या संतुलनावर विश्वास आहे.” मलायका तिच्या दिनचर्येत दोन्ही गोष्टींचा समावेश करते जेणेकरून तिचे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.
जर तुम्हालाही मलायकाप्रमाणे तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्ही तिची दिनचर्या फॉलो करू शकता. आपल्याला आपल्या शरीराच्या मर्यादा समजून घेणे आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे. ओव्हरट्रेनिंग टाळा आणि तुमच्या शरीराला विश्रांतीसाठी वेळ द्या. वर्कआऊट करताना आधी ट्रेनरची मदत घ्या. कोणतेही वर्कआऊट करताना आधी त्याची समज असणं महत्त्वाचं आहे. अन्यथा शरिराला इतर इजा होऊ शकतात.
मलायका म्हणते की, जेव्हाही कोणी फिटनेसचे ध्येय साध्य करण्याचा विचार करतो, तेव्हा त्यांना पहिली गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. फिटनेससाठी 70 टक्के आहार नियमन आणि 30 टक्के शारीरिक प्रशिक्षण महत्त्वाचे असते. तंदुरुस्त राहण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आहारात फार तीव्र बदल नसावे. डाएट प्लॅन नेहमी डॉक्टर किंवा ट्रेनरच्या सल्ल्याने बनवून घ्यावा.