नेटफ्लिक्सवरील चित्रपट, मालिका, वेब सिरीज पाहण्याची क्रेझ सगळीकडेच पाहायला मिळते. आपल्यातील अनेकजण सुट्टीच्या दिवशी आधीच डाउनलोड करून ठेवलेलं वेब सीरिजचे भाग बघत असतात. यातच जर एखाद्या चित्रपटाचा म्हणा किंवा वेब सिरीजमधला भाग आवडला की तो इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला की लगेच ती पोस्ट रिपोस्ट करून आपल्या स्टोरीवर शेअर करतो.
पण आता तुमची पोस्ट शेअर करण्याची समस्या देखील दूर केली आहे, कारण नेटफ्लिक्सने त्यांच्या युजर्ससाठी ‘मोमेंट्स’ हे नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरद्वारे तुम्ही तुमचे आवडते सिनेमे आणि शोजचे सीन्स सेव्ह करून मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करू शकाल. आता हे फिचर कोणाच्या फोनमध्ये चालणार आहे आणि कोणाच्या नाही, याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तसेच हे फिचर्स कसे वापरू शकता आणि यात कोणत्या सेटिंग्ज कराव्या लागतील यासाठी ह्या प्रक्रिया जाणून घेऊयात.
नेटफ्लिक्सच्या ‘मोमेंट्स’ या फिचरमुळे तुम्हाला आवडणारी सर्व सीन कॅप्चर करण्याची सुविधा मिळणार आहे. जेणेकरून तुम्ही ते सर्व सीन्स तुमच्या मित्रांसोबत एका क्लिकवर शेअर करू शकाल. नेटफ्लिक्सच्या ब्लॉग पोस्टनुसार स्ट्रीमरच्या मोबाईल ॲपवर कंटेन्ट पाहताना एक नवीन ‘मोमेंट्स’ पर्याय असेल. हा पर्याय प्लेबॅक स्पीड, एपिसोड, ऑडिओ व सबटायटल्स यांसारख्या इतर मीडिया प्लेयर पर्यायांच्या बाजूला असेल.
Netflix वर एक मोमेंट सेव्ह करण्यासाठी युजर्सना फक्त स्क्रीनच्या तळाशी स्वाईप करणे आणि Moments पर्यायावर टॅप करणे आवश्यक आहे. या कृतीनंतर युजर्सना पाहिजे ती संबंधित क्लिप मोबाईल ॲपमधील My Netflix टॅबमध्ये सेव्ह होईल. मग युजर्सना ते दृश्य इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅटद्वारे मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबासह शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
सध्या हे फिचर आयफोन युजर्सना मिळू लागलं आहे, याशिवाय अँड्रॉइड युजर्सना लवकरच या फिचरचा लाभ घेण्याची संधीही मिळू शकते. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमच्या फोनमध्ये आवडीचे सीन स्वतंत्रपणे पाहू शकता. एपिसोड आणि सिनेमा पुन्हा बघायचा झाल्यास तर त्याची सुरुवात थेट बुकमार्क केलेल्या सीनने होईल.
सोशल मीडियावर सीरियल, सिनेमाच्या अनेक क्लिप्स आधीच लोकप्रिय झालेल्या असतात. त्यामुळे माय नेटफ्लिक्स टॅबमधून तुम्ही कोणताही सीन सेव्ह केला असेल तो तुमच्या मित्रांपर्यंत अगदी सहज पाठवू शकता. त्यात तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सीन्स शेअर करू शकाल. तिथे तुम्हाला शेअरचा पर्यायही मिळेल. यात Netflix या स्पर्धेत सामील होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्याच्या कन्टेन्टकडे अधिक लक्ष वेधले जाऊ शकते.