भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्तेत आहे. सानिया मिर्झा हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. सानिया मिर्झा आणि शोएब यांच्या घटस्फोटाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र सानिया हिची चर्चा रंगली आहे.
घटस्फोटानंतर सानिया कशी कमाई करते? याबद्दल देखील चर्चा रंगलेली असते. मीडिया रिपोर्टनुसार, टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर सानिया मिर्झा वर्षाला 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. सानिया मिर्झा जाहिराती, खासगी गुंतवणूक आणि स्वतःच्या व्यवसायातून गंडगंज पैसा कमावते.
सानिया मिर्झा एशिनय पेंट्स, लॅक्मे, डेन्यूब प्रॉपर्टीज, हर्षीज या कंपन्यांसाठी काम करते. एवढंच नाही तर, भारतात आणि दुबई याठिकाणी देखील सानिया हिची टेनिस ऍकडमी आहे. ज्यामधून सानिया वर्षाला कोट्यवधींची माया कमावते. शिवाय सानिया आलिशान घरात राहते.
हैदराबाद याठिकाणी देखील सानिया हिने भव्य घर आहे. ज्याची किंमत 13 कोटी रुपये आहे. शिवाय अभिनेत्रीचं दुबईत देखील घर आहे. मीडियारिपोर्टनुसार, सानिया हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, सानिया हिचं नेटवर्थ 26 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 216 कोटी रुपये आहे. सानिया कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
सांगायचं झालं तर, सानिया सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी स्वतःचा हटके फोटो पोस्ट करत सानिया हिने कॅप्शनमध्ये, ‘काहीही झालं तरी… सर्वांना सामोरं जावं लागतं.’ असं लिहिलं होतं.
सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सानिया आणि शोएब लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. घटस्फोटानंतर सानिया सिंगल मदर म्हणून सांभाळ करते. मुलासोबत सानिया फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.