Ghibli फोटो तयार होत नाही? मग ही चूक करताय… ‘या’ टिप्स लक्षात ठेवा आणि ‘असे’ फोटो निवडा

| Updated on: Apr 01, 2025 | 2:07 PM

Ghibli फोटो तयार करताना तुम्हाला समस्या येत आहे? मग या टिप्स फॉलो करा...

Ghibli फोटो तयार होत नाही? मग ही चूक करताय... या टिप्स लक्षात ठेवा आणि असे फोटो निवडा
Ghibli
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

सध्या सगळीकडे घिबली आर्ट ॲनिमेशनने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडताच समोर अनेक घिबली स्टाईल फोटो पाहायला मिळतात. AI प्लॅटफॉर्म ChatGPT द्वारे जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या फोटोंचे ॲनिमेशन बनवत आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ प्रीमियम वापरकर्त्यांसाठी होती. पण आता मोफत वापरकर्ते Ghibli ॲनिमेशन देखील तयार करू शकतात. पण हे फोटो तयार करत असताना अनेक समस्या देखील येत आहेत. पण तुम्ही योग्य फोटोची निवड केली तर तुमचा घिबली स्टाईल फोटो लगेच तयार होईल. यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत…

नेमकं काय करावं?

Ghibli फोटो करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पार्श्वभूमी असलेले फोटो निवडा. ज्यामध्ये झाडे, फुले, नदी, नाले, डोंगर अशा गोष्टींचा समावेश असेल. तज्ज्ञांच्या मते हिरवळ, आकाश किंवा सूर्यास्त यासारखे घटक घिबलीच्या रंगसंगती आणि भावनिकतेला शोभतात. Ghibli स्टाईलमध्ये प्रकाशाचा वापर अतिशय मऊ आणि स्वप्नवत असतो. त्यामिुळे भडक लाईट असलेले किंवा उन्हात काढलेले फोटो वापरणे टाळा. जर तुम्ही सौम्य फोटो वापरलेत तर Ghibli फोटो अगदी सहज आणि सुंदर होईल.

हे सुद्धा वाचा

पाहा : Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव ओळखा

फोटोचं Ghibli स्टाईलमध्ये रूपांतर करताना त्याची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. कमी रिझोल्यूशनचा फोटो निवडल्यास एडिटिंगनंतर तो अस्पष्ट दिसू शकतो. त्यामुळे नेहमी हाय-क्वालिटी फोटो निवडा. हे क्वालिटी फोटो तयार झाल्यावर अतिशय सुंदर बनतात. फोटोमध्ये तीन ते चार लोक असतील तर ते फोटो टाळा. एका व्यक्तीचा शांत किंवा विचारमग्न क्षण असलेला फोटो निवडण्यावर प्रधान्य द्या. तज्ज्ञांच्या मते, Ghibli फोटो तयार करताना कोणता फोटो वापरावा हे पाहणे गरजेचे आहे.

काय आहे घिबली?

‘घिबली’ या अॅनिमेशनचा जपानशी संबंध आहे. याचे श्रेय हायाओ मियाझाकी आणि त्यांचा स्टुडिओ घिबलीला जाते. हायाओ मियाझाकी यांच्या स्टुडिओचे नाव घिबली आहे. ते या स्टुडीओचे संस्थापक आहेत. मियाझाकी हे जपानी ॲनिमेशनच्या जगाचा राजा मानले जातात. त्यांनी बनवलेले चित्रपट जगभर पसंत केले जातात. त्यांनी 25 हून अधिक ॲनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या आहेत. ‘स्पिरिटेड अवे’ हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात 23000 कोटींहून अधिक कमाई केली होती.