हृतिक रोशन याने पोटगी म्हणून सुझान खानला दिले 400 कोटी रुपये? सर्वात महागडा घटस्फोट आणि…

| Updated on: Jul 20, 2024 | 3:32 PM

Hrithik Roshan and Sussanne Khan Divorce : हृतिक रोशन हा कायमच चर्चेत असणारा बॉलिवूड अभिनेता आहे. हृतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हृतिक रोशन हा त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे.

हृतिक रोशन याने पोटगी म्हणून सुझान खानला दिले 400 कोटी रुपये? सर्वात महागडा घटस्फोट आणि...
Hrithik Roshan and Sussanne Khan
Follow us on

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सुझान खान हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो सबा आझाद हिला डेट करतोय. दुसरीकडे सुझान खान ही देखील आयुष्यात पुढे निघालीये. हृतिक रोशन आणि सुझान खान यांची जोडी चाहत्यांची आवडती होती. मात्र, यांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वानाच मोठा धक्का बसला. हृतिक रोशन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी त्यांच्या घटस्फोटावर कधीही फार काही भाष्य केले नाही. हृतिक रोशन आणि सुझान यांना दोन मुले आहेत. 

हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, हृतिक रोशन आणि सुझानचा घटस्फोट हा सर्वात महागडा घटस्फोट आहे. हृतिक रोशनला घटस्फोटानंतर सुझान खान हिला 400 कोटी रुपये द्यावे लागल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसली. यादरम्यान लोकांनी सुझान खान हिच्यावर जोरदार टीका देखील केली होती. 

पोटगी म्हणून सुझान खानने हृतिक रोशनकडे 400 कोटी मागितले आणि हृतिकने ती रक्कम सुझानला दिल्याचे काही रिपोर्टमध्येही सांगण्यात आले. इतकी मोठी पोटगी घेतल्याने लोक सतत त्यावेळी सुझान खान हिला खडेबोल सुनावताना देखील दिसले. त्यावर सुझान खान हिने भाष्य केले नाही. परंतू हृतिक रोशनने यावर खुलासा केला. 

400 कोटींच्या पोटगीनंतर हृतिक रोशन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये हृतिक रोशनकडून स्पष्ट खुलासा करण्यात आला की, सुझानला पोटगी म्हणून 400 कोटी दिल्याची चर्चा चुकीची आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत. विनाकारण हा त्रास देण्याचा एक प्रकार असल्याचे हृतिक रोशन याने म्हटले होते. 

हृतिक रोशनने खुलासा करत हे देखील म्हटले होते की, सुझान खान हिने पोटगी म्हणून काहीच रक्कम त्याच्याकडून घेतली नाही. मात्र, अजूनही चर्चा आहे की, सुझान खान आणि हृतिक रोशन यांचाच बॉलिवूडमध्ये सर्वात महागडा घटस्फोट आहे. नुकताच भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतलाय.