बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी सोबत अनेक वर्षांचा संसार केला, त्यांना मुलंबाळं झाली आणि त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशीच एक सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान. करिअरच्या शिखरावर असताना हृतिकने सुझानशी लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. या दोघांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. मात्र लग्नाच्या 14 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. लग्नापेक्षाही जास्त हृतिक आणि सुझाच्या घटस्फोटाची चर्चा अधिक झाली होती. या दोघांनी घटस्फोटामागचं कारण कधी स्पष्ट केलं नाही. घटस्फोटानंतर हृतिकने सुझानला दिलेल्या भरभक्कम पोटगीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिक आणि सुझानचा घटस्फोट हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा घटस्फोट होता. कारण हृतिकला सुझानला पोटगी म्हणून खूप मोठी रक्कम द्यावी लागली होती. सुझानने हृतिककडे 400 कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर हा आकडा 380 कोटी रुपयांवर निश्चित झाला. आता घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान दोघं मिळून मुलांचं संगोपन करत आहेत. मुलांसाठी अनेकदा या दोघांना एकत्र आल्याचं पहायला मिळालं.
घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. एकीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर दुसरीकडे सुझान ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अली गोणीचा भाऊ अर्सलान गोणीला डेट करतेय. इतकंच काय तर या चौघांमध्येही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतं. एकमेकांच्या वाढदिवशी हे सोशल मीडियावर शुभेच्छा देणारे पोस्ट लिहितात, तर कधी एकत्र पार्टीसुद्धा करतात. नुकतंच थर्टी फर्स्टच्या पार्टीतही हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानला एकत्र पाहिलं गेलं होतं. यावेळी हृतिक आणि सुझानची दोन्ही मुलंही पार्टीला उपस्थित होती.
Hrithik Roshan heads to Dubai with ex-wife Sussanne Khan, her boyfriend Arslan Goni, and their son Hridaan !!
byu/IndianByBrain inBollyBlindsNGossip
हृतिक-सबा, सुझान-अर्सलान यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्याबद्दल सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खानने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “आमचं कुटुंब हे प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम ‘मॉडर्न फॅमिली’सारखंच आहे. आम्ही जणू नव्या मॉडर्न फॅमिलीसारखंच आहोत. आमच्यात खूप वेडेपणा आहे. इथे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचा स्वीकार मनमोकळेपणाने करतो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला निश्चितच आम्हाला थोडा वेळ लागला. पण आता आम्ही सर्वजण एकत्र खुश आहोत. ही खूप सुंदर भावना आहे. आम्ही सर्वजण एकत्र पार्टी करतो, मजामस्ती करतो, नाचतो”, असं तो म्हणाला होता.