मुंबई : कपूर, खान, बच्चन या प्रसिद्ध बॉलिवूड कुटुंबांच्या यादीमध्ये रोशन कुटुंब देखील अव्वल स्थानी आहे.. रोशन कुटुंबाच्या अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अभिनेता हृतिक रोशन लोकप्रिय अभिनेत्यांपैकी आहे.. हृतिक याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.. हृतिक रोशन याचे वडील राकेश रोशन यांना देखील अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं राकेश रोशन यांना अभिनय क्षेत्रात यश मिळालं नाही… अपयश मिळाल्यामुळे त्यांनी कधी मागे वळून देखील पाहिलं नाही.. राकेश रोशन यांनी अखेर स्वतःचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला.. अभिनय क्षेत्रात राकेश रोशन यांनी यश मिळालं नाही.. पण आज ते बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत…
राकेश रोशन यांनी ‘करण-अर्जुन’ (Karan-Arjun), ‘खून भरी मांग’ (Khoon Bhari Maang), ‘किशन कन्हैया’ (Kishan Kanhaiyya), ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai), ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं.. ‘कहो ना प्यार है’ सिनेमासाठी राकेश रोशन यांना फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं..
रिपोर्टनुसार, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली. ज्यामुळे राकेश रोशन यांना अंडरवर्ल्डचा धोका होता.. 10 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 63 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक केले.. सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली होती.. अशात झालेल्या नफ्यातील काही टक्के पैसे अंडरवर्ल्डकडून मागण्यात आले.. राकेश रोशन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या ऑफिसबाहेर काही शूटरने त्यांच्यावर गोळीबार केला…
या गोळीबारात राकेश रोशन जखमी झाले होते.. गोळीबारात राकेश रोशन यांना दोन गोळ्या लागल्या होत्या.. एक गोळी त्यांच्या हाताला लालगी होती, तर दुसरी गोळी छातीला लागली होती.. गोळी लागल्यानंतर राकेश रोशन यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं … तेव्हा त्यांचा ड्रायव्हर आनन फानन यांनी राकेश रोशन यांचा जीव वाचवला.
राकेश रोशन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. 2019 राकेश रोशन यांना कर्करोग झाल्याची बातमी समोर आली.. पण या संकटावर देखील राकेश रोशन यांनी मात केली.. सध्या राकेश रोशन त्यांच्या आगामी सिनेमाच्या तयारीत आहेत… राकेश रोशन यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. आजही राकेश रोशन यांची एक झकल पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात…