अभिनेता हृतिक रोशन याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. हृतिक फक्त त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत नसतो, तर अभिनेता त्याची पर्सनॅलिटी आणि डान्समुळे देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. पण आता हृतिक त्याच्या हस्ताक्षरामुळे चर्चेत आला आहे. खुद्द हृतिकने त्याच्या जुन्या नोट्सचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सांगायचं झालं तर, ‘कहो ना प्यार है’ सिनेमाच्या दरम्यानचे नोट्स अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहे.
‘कहो ना प्यार है’ सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. 25 वर्षांनंतर अभिनेत्याने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून हृतिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. आता पोस्ट केलेल्या नोट्समध्ये अभिनेत्याने सिनेमाच्या तयारीबद्दल लिहिलं आहे.
जुने नोट्स शेअर करत कॅप्शनमध्ये अभिनेता म्हणतो, ’27 वर्षांपूर्वीचे माझे नोट्स… पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’ साठी तयारी करताना… मला आठवत आहे की माझ्यावर किती दडपण येतं… आता देखील नवा सिनेमा सुरु करताना माझ्या मनावर दडपण असतं. हे सांगताना मला लाज वाटत आहे. पण इंडस्ट्रीमध्ये 25 वर्ष काम केल्यानंतर मी सर्वकाही पार पाडू शकतो… मी नोट्स पाहतो आणि मला असं वाटतं – काहीही नाही. चांगली गोष्ट? वाईट गोष्ट? सर्वकाही तसंच आहे.
‘बऱ्याच गोष्टी आहेत ज्यासाठी कायम आभारी राहिलं पाहिजे… अद्याप बरंच काही करायचं बाकी आहे. ‘कहो ना प्यार है’ सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. एकाच गोष्टीचा उत्साह आहे आणि तो म्हणजे माझ्या रफ बूकमध्ये लिहिल्या या गोष्टी…’ असं हृतिक म्हणाला. सध्या अभिनेत्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.
पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जसा दिसतो तसं लिहितो…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तुझ्या नोट्स जपून ठेवल्या आहेस… फार उत्तम…’ अभिनेता सोशल मीडियावर कामय फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.