ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचे मोठे विधान, पश्मिना म्हणाली, कुटुंबाचा वारसा आता…

| Updated on: Jun 19, 2024 | 5:38 PM

Hrithik Roshan and Pashmina Roshan : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशनने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या मुख्य भूमिका केल्या आहेत.

ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचे मोठे विधान, पश्मिना म्हणाली, कुटुंबाचा वारसा आता...
Hrithik Roshan
Follow us on

अभिनेता ऋतिक रोशन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऋतिक रोशनची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. नेहमीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात धमाल करताना दिसतात. ऋतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते. ऋतिक रोशन आणि सबा दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सबा आझाद हिने ऋतिक रोशनला डेट करत असल्याने आपल्याला काम मिळत नसल्याचे म्हटले.

आता ऋतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन ही बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी तयार आहे. ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. पश्मिना रोशन ही आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे. नुकताच पश्मिना रोशन हिने चुलत भाऊ ऋतिक रोशन याच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

पश्मिना रोशन हिने म्हटले की, हृतिकच्या पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची बरोबरी करणे खूप कठीण आहे. कधी कधी मी वडिलांची गाणे ऐकते आणि त्यांच्या कलेशी कधी बरोबरी करू शकेल का याचा विचार करते. पश्मिना पुढे म्हणाली की, मी या गोष्टींकडे दबाव म्हणून नव्हे तर एक स्वप्न म्हणून नक्कीच पाहते.

हृतिक कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यात यशस्वी ठरला आहे. मला देखील वाटते की, मी हे करू शकते. अभिमान वाटेल असे काम मला करायचे आहे. सध्या मी नक्की थोडी चिंताग्रस्त आहे. पश्मिना रोशन ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. पश्मिना रोशन सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे.

पश्मिना रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता पश्मिना रोशनचा हा चित्रपट काय धमाका करतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटात रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझही बघायला मिळत आहे.