बिग बॉस मराठीच्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. नुकताच बिग बॉसच्या घरात कडाक्याची भांडणे झाली. मुळात म्हणजे हे बिग बॉस मराठीचे हे सीजन तूफान चर्चेत आहे. बिग बॉस मराठी 5 च्या घरात एक टास्क झाला. सतत निर्माते हे घरातील सदस्यांना टास्क देताना दिसत आहेत. या टास्कमध्ये निकी तांबोळी यांच्या ग्रुपकडून घनश्याम दरोडे अर्थात छोट्या पुढारीला पाठवण्यात आले. यावेळी अंकिता आणि धनंजय पवार यांचा खोटेपणा उघडकीस आला. रितेश देशमुख याने घरातील काही सदस्यांना व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओमध्ये घरातील लोक आपल्याबद्दल मागे काय बोलतात हे दाखवण्यात आले.
बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून छोटा पुढारी आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये खास मैत्री ही बघायला मिळतंय. विशेष म्हणजे निकी तांबोळी ही छोट्या पुढारीला आपला भाऊ मानते. घनश्यान हा देखील निकी तांबोळीला निकी ताई म्हणून हाक मारताना दिसतो. अंकिता आणि धनंजय पवार यांच्यामुळे या दोघांमध्ये वाद होताना दिसले.
हेच नाही तर निकी आणि छोट्या पुढारीमध्ये कडाक्याची भांडणे झाली. यावेळी निकी तांबोळी ही थेट म्हणते की, तू फेक आहेस आणि पहिल्या दिवसापासून तू फक्त आणि फक्त फेक वागत आहे. यावर छोटा पुढारी हा निकी तांबोळी हिला विचारताना दिसतोय की, मी काय फेक वागलो सांग मला….यानंतर तिथून निघून जाण्यास निकी घनश्यामला सांगते.
छोटा पुढारी म्हणतो की, तुला मी बहिणी मानले आहे आणि तू असे बोलत आहे…मी शपथ घेऊन सांगतो की, मी काहीही फेक वागलो नाही किंवा तुमच्याबद्दल दुसऱ्या ग्रुपमधून जाऊन काहीही बोलला नाही. हे परत परत सांगताना छोटा पुढारी हा दिसला. मात्र, यावेळी निकी तांबोळी ही छोट्या पुढारीला सतत फेक असल्याचे म्हणताना दिसली.
नेहमीच छोट्या पुढारीवर आरोप केला जातो की, तो दोन्ही ग्रुपमध्ये जाऊन बसतो आणि इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करतो. मात्र, अरबाज पटेल, निकी तांबोळी आणि जान्हवी यांच्यासोबत घनश्याम दरोडे हा प्रामाणिक वागताना दिसतोय. आता बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळणार आहे. निकी आणि अरबाजमध्ये मोठा वाद होणार आहे.