Salman Khan: ‘… तर आज ऐश्वर्या माझी असती’, जेव्हा सलमान खानने व्यक्त केल्या मनातील भावना

| Updated on: Aug 30, 2024 | 12:20 PM

Salman Khan - Aishwarya Rai: जेव्हा सलमान खानने व्यक्त केल्या मनातील भावना, सर्वांसमोर भाईजान म्हणाला होता, '... तर आज ऐश्वर्या माझी असती', तेव्हा झालं तरी काय होतं? कायम रंगलेली असते सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा...

Salman Khan: ... तर आज ऐश्वर्या माझी असती, जेव्हा सलमान खानने व्यक्त केल्या मनातील भावना
Follow us on

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. अनेक वर्षांपूर्वी सलमान – ऐश्वर्या यांचे मार्ग मोकळे झाले आहेत. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. एकदा तर, ‘ऐश्वर्या माझी असती…’ असं देखील सलमान खान म्हणाला होता. एका मुलाखतीत सलमान खान याने ऐश्वर्या आणि ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

प्रत्येकाला माहिती आहे, ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमामुळेच सलमान – ऐश्वर्या यांच्यातील नातं बहरलं. सिनेमात सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगन यांनी मुख्य भूमिका साकारली होत. सिनेमातील लव्हट्रायंगलने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तगडी कामाई केली.

1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची कशा तीन व्यक्तींवर आधारलेली होती. एक पती त्याच्या पत्नीला सात समुद्रापार तिचा प्रियकर समीर याला भेटवण्यासाठी घेवून जातो. सिनेमात सलमानने समीर ही भूमिका साकारली होती. ऐश्वर्या, नंदीना या भूमिकेत होती, तर अजयने पती वनराजची भूमिका साकारली होती.

 

 

सिनेमात अजय याने पाहुण्या कलाकारची भूमिका साकारली होती. पण सिनेमातील खरा हिरो अजयच ठरला. अशात सिनेमाची कथा सर्वांना आवडली. सिनेमाच्या अखेरीस ऐश्वर्या तिच्या प्रेमाचा त्याग करत पतीकडे परतते. याच कारणामुळे सलमानला सिनेमाचा शेवट आवडला नाही.

एका मुलाखतीत खुद्द सलमान खान यावर मौन सोडलं होते. भाईजान म्हणाला होता, ‘सिनेमाची स्क्रिप्ट मी लिहिली असती तर, ऐश्वर्या माझी असती. नंदिनीने समीरची निवड केला असती. पारंपरिक सिनेमांमध्ये प्रेमाला महत्त्व नसतं. ‘ असं देखील अभिनेता म्हणाला होता.

 

 

‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. आजही सिनेमातील गाणी चाहते तितक्याच आवडीने ऐकतात. शिवाय सिनेमातील काही सीन देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिनेमामुळे ऐश्वर्या – सलमान यांच्या नात्याची चर्चा देखील रंगलेली असते.