मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. आता या प्रकरणावर कंगनानं एक ट्विट करत या प्रकरणाविषयी भाष्य केलं आहे. या ट्विटमध्ये कंगनाने या प्रकरणातील सत्य बाहेर आले तर ठाकरे सरकार पडेल, असे वक्तव्य केले आहे. (‘If the truth in this case comes out, the Thackeray government will fall,’ Kangana’s big statement)
कंगना रनौतचे ट्विट
My X-rays can detect huge conspiracy here,this cop was suspended after Shivsena came in power they got him back, if investigated properly not only hidden skeletons will roll out but even Maharashtra government will fall,I can also sense 200 more FIR’s on me, bring it on,Jai Hind https://t.co/Mt7KpKNghp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 14, 2021
एनआयएने सांगितल्यानुसार, आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या चौकशीनंतर बेड्या
NIA arrests Mumbai police officer Sachin Vaze in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani’s house in Mumbai https://t.co/6AZvHH6rz2
— ANI (@ANI) March 13, 2021
मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा NIA कडून अटक करण्यात आली. जवळपास 13 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेंवर कोणते आरोप?
स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
‘अरे बघताय काय सामील व्हा’; राज ठाकरेंच्या मनसेत ‘महाभरती’ला सुरुवात