मुंबई, 17 जुलै 2023 : बॉलिवूड अशा अनेक अभिनेत्री ज्यांनी लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. तर काही अभिनेत्रींमात्र गरोदर राहिल्यानंतर लग्न केलं. सध्या अभिनेत्री इलियाना डिक्रुझ तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. इलियाना सतत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. इलियाना हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची माहिती दिली. पण अभिनेत्रीच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे… याबद्दल अभिनेत्रीने मौन बाळगलं होतं. पण आता इलियाना हिने होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र इलियाना हिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांची चर्चा रंगत आहे.
इलियाना हिने तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. पण तो कोण आहे, काय करतो, त्याचं नाव काय आहे? याबद्दल अभिनेत्रीने काहीही सांगितलेलं नाही. अनेक दिवसांनंतर इलियाना हिने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘डेट नाईट’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र इलियाना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.
इलियाना हिने जेव्हा आई होणार असल्याची घोषणा केली होती, तेव्हा अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावासोबत इलियाना हिच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. पण आता इलियाना हिने बॉयफ्रेंडचा फोटो पोस्ट केल्यामुळे सर्व चर्चांनी पूर्णविराम लागला आहे. इलियाना सध्या तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे. शिवाय अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न अभिनेत्री करत आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीची घोषणा केली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पण लग्नाआधी आई होणार असल्याची घोषणा केल्यामुळे इलियानाला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला.
इलियाना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इलियाना हिने अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘बर्फी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण आता प्रेग्नेंसीमुळे अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे.
सोशल मीडियावर देखील इलियाना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.