बॉलिवूडमध्ये एखाद्या सेलिब्रिटी कपलचं घटस्फोट होणं नवीन गोष्ट नाही… घटस्फोट झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला, तर काहींनी मात्र लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार केला. झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामधील एक म्हणजे अभिनेता आमिर खान याचा भचा आणि अभिनेता इम्रान खान… पहिली पत्नी अवंतिका मलिक हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात लेखा वाशिंगटन हिची एन्ट्री झाली.
रिपोर्टनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून इम्रान आणि लेखा एकमेकांना डेट करत आहे. आता अभिनेता पुन्हा गर्लफ्रेंड लेखा हिच्यासोबत नवीन सुरुवात करणार आहे. अभिनेत्याने मुंबईतील वांद्रे याठिकाणी घर भाड्याने घेतलं आहे. इम्रान याने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याचं घर भाड्याने घेतलं आहे.
करण जाोहर याच्या घरात इम्रान आणि गर्लफ्रेंड लेखा राहणार आहेत. ज्यासाठी अभिनेत्याला करण याला महिन्याला भाडं म्हणून 9 लाख रुपये मोजवे लागणार आहेत. सांगायचं झालं तर, लेखा हिच्यासोबत भाड्याने घर घेण्यापूर्वी इम्रान वांद्रे याठिकाणी असलेल्या स्वतःच्या बंगल्यात राहत होता.
‘मनीकंट्रोल डॉट कॉम’च्या रिपोर्टनुसार इम्रान आणि लेखा आता प्रसिद्ध कार्टर रोडवरील क्लिफपेट येथील तीन मजली अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान – लेखा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याने लेखा हिच्यासोबत असलेल्या नात्याची अधिकृत घोषणा देखील केली आहे.
इम्रान याच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव अवंतिका मलिक असं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद मिटले नाहीत. अखेर इम्रान आणि अवंतिका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये इम्रान आणि अवंतिका याचा घटस्फोट झाला.
इम्रान याची गर्लफ्रेंड लेखा हिचा देखील घटस्फोट झालेला आहे. लेखा हिचं पहिलं लग्न पत्रकार पाब्लो चटर्जीसोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
इमरान याने वांद्र येथे भाड्याने घर घेतलं आहे. वांद्रे याठिकाणी बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी राहतात, शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांसारखे अनेक सेलिब्रिटी वांद्रे येथे राहतात.