मुंबई – टिव्ही मालिकेमधून प्रसिध्द झालेले अधिकजण आहेत. त्यापैकी काहीजण असे आहेत की, ज्यांनी आपली वेगळी अदा जपल्याचे पाहायला मिळते. त्यापैकी एक म्हणजे मौनी रॉय (Mouni Roy) तिचं नुकतंच धुमधडाक्यात लग्न झाल्याचं आपण पाहिलं. अजून त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचे काही कार्येक्रम अजूनही होणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक संगीताचा (sangeet ceremony) कार्यक्रम नुकताच पार पडला त्यामध्ये मौनी रॉय ने तिचा पती सुरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत तुफान डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मौनी रॉयचा मित्र राहूल सुध्दा गाण्यांवर अधिक थिरकला असल्याचे पाहायला मिळत आहे. संगीताच्या कार्यक्रमाला दोघांच्या घरची लोक उपस्थित होती. तसेच झालेल्या कार्यक्रमात गोल्डन लेग्यांमध्ये मौनी रॉय अधिक उठून दिसत होती.
या गाण्यावर लावले ठुमके
संगीताच्या कार्यक्रमात मौनी रॉय आणि सुरजच्या घरचे आणि काही नातेवाईक उपस्थित होते. दोघेही डान्स करत असल्याचे व्हिडीओत पाहावयास मिळत आहे. त्यांनी घर मोरे परदेसिया, देसी गर्ल जैसे सारख्या अनेक गाण्यांवर ठुमके लावले आहेत. त्यांना डान्स करताना पाहून असं वाटतंय की, त्यांना त्या स्टेजवर जोरात ठुमके लावले असणार. तसेच नव्या कपलने संगीताच्या कार्यक्रमासाठी प्रॅक्टिस सुध्दा केली असेल.
लुकची सुध्दा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा
या सोहळ्यात मौनीने लेहेंगा परिधान करून धुमाकूळ घातला असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दागिने, हातात मेहंदी आणि शंखा-पोळा असं सगळं तिनं संगीत सोहळ्यात घातलं होतं. मित्रांसोबत संगीत सोहळ्यातील व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मौनीचा क्लोजअप लूक दिसू शकतो, तिचा लुकची सुध्दा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
दोघांचे फोटो चाहत्यांच्या पसंतीला
मौनी रॉयने आपल्या मित्रासोबत म्हणजे सुरज सोबत 27 जानेवारीला गोव्यात लग्न केलं होतं. लग्न केल्याचं तिनं आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून चाहत्यांना सांगितलं होतं. दोघांनी बंगाली आणि साऊथ इंडियन पध्दतीने दोन वेळा तिथं लग्न केलं असल्याची माहिती सुध्दा दिली होती. लग्न झाल्यानंतर दोघांनाही त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांचे लग्नातील फोटो सुध्दा अनेक चाहत्यांच्या पसंतीला पडले होते. आता दोघेही हनीमुनला कधी कुठे जाणार याची चाहते वाट पाहत असल्याचे सुध्दा सोशल मीडियावर पाहायला मिळते.