मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते संपूर्ण शहरे बंद होती. आता याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे. (India Lockdown movie’s first poster release)
MADHUR BHANDARKAR FINALISES STAR CAST + UNVEILS FIRST POSTER… #PrateikBabbar, #SaiTamhankar, #ShwetaBasuPrasad, #AahanaKumra, #PrakashBelawadi and #ZarinShihab to star in #MadhurBhandarkar‘s next directorial venture… Titled #IndiaLockdown… Filming begins next week. pic.twitter.com/AqlCzrT9WY
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2021
या चित्रपटाच्या नावाची ही घोषणा करण्यात आली आहे.’इंडिया लॉकडाऊन’ (India Lockdown) असेल या चित्रपटाचे नाव आहे. मधुर भंडारकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. इंडिया लॉकडाऊन चित्रपटाचे पोस्टर आज तरण आदर्शने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात प्रितीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, सई ताम्हणकर, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यापासून सुरू होईल. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. भांडारकर एंटरटेनमेंट आणि पीजे मोशन पिक्चर्स इंडिया लॉकडाउन चित्रपटाची निर्मिती करत आहेत.मधुर भंडारकर यांनी एका महिन्यापूर्वी इंडिया लॉकडाऊन चित्रपटाची घोषणा केली होती. वृत्तानुसार, या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग मुंबई व आसपासच्या भागात होणार आहे. मधुर भंडारकर यांच्या पेज 3 या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये त्रिशक्तीमधून पाऊल ठेवले होते.
संबंधित बातम्या :
कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स
Revealed | अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार?
‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं…
(India Lockdown movie’s first poster release)