IND vs PAK : अरे बाप रे बाप, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या थरारक विजयावर बिग बी म्हणाले…

| Updated on: Jun 10, 2024 | 10:06 AM

India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष असतं सामन्याकडे... भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या थरारक विजयावर बिग बी म्हणाले..., अनेक सेलिब्रिटींनी केलं भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक...

IND vs PAK : अरे बाप रे बाप, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या थरारक विजयावर बिग बी म्हणाले...
अमिताभ बच्चन
Follow us on

India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजे काही सांगायलाच नको. दोन्ही देशांच्या नजरा फक्त सामान्याकडे असतात. रविवारी देखील असंच काही झालं. रविवारी झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या सामन्यात 6 धावांनी टीम इंडियाने बाजी मारली. भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. पण अटी-तटीच्या सामन्यात टीम इंडियाच बाजी मारली आणि पाकिस्तानला अपयश मान्य करावा लागला. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांच लक्ष्य दिलं होतं. पाकिस्तानी टीम निर्धारित 20 षटकात 7 बाद 113 धावाच करु शकली. 6 धावांनी टीम इंडियाने बाजी मारली.

भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. फक्त भारतीयांनी नाहीतर, सेलिब्रिटींनी देखील विजयावर आनंद व्यक्त केला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक्सवर एक पोस्ट करत आनंद व्यक्त केल्या आणि टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या…

 

 

एक फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘टी 5037(i) – अरे बाप रे बाप! Ind v Pak सामना पाहात होतो… पण मध्येच टीव्ही बंद केला… कारण आपण हारत आहोत असं वाटलं… अचानक इंटरनेट पाहिलं आणि आपण जिंकलो, आपण जिंकलो, आपण जिंकलो!!! भारत भारत भारत भारत भारत भारत भारत…’ असं म्हणत बिग बी यांनी आनंद व्यक्त केला.

 

 

फक्त अमिताभ बच्चन यांनी नाही तर, अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. अभिनेत्री म्हणाली, ‘वाह काय सामना होता… कसलं पुनरागमन आणि कसली झुंज…. 119 धावांचा बचाव करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला पूर्ण गुण…’ शिवाय अभिनेत्रीने क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याला देखील दमदार खेळीसाठी टॅग केलं आहे….

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून आनंद व्यक्त केला. अभिनेता म्हणाला, ‘काय विजय होता… भारतीय टीम… खरंच… #हॅप्पीसंडे’, आनंद व्यक्त करत अभिनेत्री श्रद्धा कपूर म्हणाली, ‘मला खूप आनंद होत आहे जणू मी सुद्धा 2-3 विकेट घेतल्या आहेत.’ भारताच्या विजयानंतर विजय वर्मा, जयदीप अहलावत, सनी हिंदुजा, ईशान खट्टर, श्रद्धा कपूर, कुणाल खेमू, बॉबी देओल, संजय कपूर, कार्तिक आर्यन यांनी आनंद साजरा केला…