Indian Idol फेम अरुणिता कांजीलाल प्रेग्नेंट? व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण

| Updated on: Oct 21, 2024 | 12:04 PM

Indian Idol फेम अरुणिता कांजीलाल प्रेग्नेंट? फोटो व्हायरल होत असल्यामुळे चर्चांना उधाण... नक्की काय आहे फोटो मागचं सत्य? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरुणिता कांजीलाल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Indian Idol फेम अरुणिता कांजीलाल प्रेग्नेंट? व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण
Follow us on

Indian Idol या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली गायिका अरुणिता कांजीलाल हिचा एक फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अरुणिता प्रेग्नेंट दिसत आहे. पिवळ्या साडीमध्ये प्रेग्नेंट दिसणारी महिला खरंच अरुणिता आहे का? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. फोटोबद्दल सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडिया आणि सर्वत्र व्हायरल होणारा अरुणिता हिचा फोटो फेक आहे. फोटोमध्ये दिसणारी प्रेग्नेंट महिला अरुणिता नसून फोटो एडिट करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फोटोची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता अरुणिता हिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण त्या फोटोमध्ये काहीही तथ्य नसून फोटो एडिट केला आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

अरुणिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अरूणिता कांजीलाल हिने इंडियन आयडियलचा 12 वा सिझन गाजवला. इंडियन आयडियलचा 12 वा सिझन पवनदीपने जिंकला होता. तर अरूणिता कांजीलाल आणि सायली कांबळे हे रनरअप होते. अरूणिताच्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. इंडियन आयडियलचा 12 चा विजेता पवनदीप याच्यासोबत अरूणिताचं नाव जोडलं जातं.

शोनंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, दोघे एकत्र अनेक शो देखील करताना दिसले. दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचीही चर्चा वारंवार होत असतात. अरूणिता आणि पवनदीप दोघे एकमेकांसोबत दिसतात. मात्र दोघांनी याबाबत कोणतीही जाहीर भूमिका स्पष्ट केलेली नाही.

अरुणिता सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर अरुणिताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अरुणिता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अरुणिताच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.