मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | ‘इंडियन आयडल’ फेम नितिन कुमार याच्या वडिलांचं निधन झालं आहे. खुद्द गायकाने वडिलांचा फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. नितिन कुमार याच्या वडिलांचं निधन रस्ते अपघातात झालं आहे. रिपोर्टनुसार नितिन कुमार याचे वडील राजेंद्र कुमार कारमधून बाजारात जात होते. तेव्हा अंब-हमीरपूर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या पिकअपने राजेंद्र कुमार यांना धडक मारली आणि गायकाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र कुमार यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घडलेल्या घटनेची सर्व माहिती इरफान नावाच्या एका दुकानदाराने पोलिसांना दिली.
दुकानदार इरफार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘राजेंद्र कुमार दुकानातून सामान घेऊन जात होते. जवळपास रात्री 8 च्या सुमारास राजेंद्र कुमार सामान घेऊन त्यांच्या गाडीच्या दिशेने जात होते. तेव्हा एका पिकअपने त्यांनी धडक दिला आणि त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतप पिकअप चालक फरार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. अज्ञात चालकावर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु आहे. सध्या पोलीस फरार चालकाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नितिन कुमार याच्या वडिलांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेकांनी गायकाच्या वडिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
नितिन कुमार याने वडिलांसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत गायक म्हणाला, ‘आयुष्यात फक्त एकदा तुमच्यासोबत फोटो काढला आहे. मला नव्हतं माहिती तुम्ही इतक्या लवकर मला सोडून जाल. आज मी जे काही मिळवलं आहे किंवा आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे…तुम्ही मला सोडून गेलात. पण तुम्ही कायम माझ्यासोबत राहाल…’ असं म्हणते नितिन कुमार याने दुःख व्यक्त केलं.