मुंबई : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद Indian Council for Cultural Relations (ICCR) )आणि संगीत क्षेत्रातील नामवंतांनी विमानतही भारतीय संगीत ऐकू यावे यासाठी ताण छेडली असून सूर आळवले आहेत. त्यासाठी संगित दिग्गजांच्या शिष्टमंडळाने नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. त्यांना भारतीय संगिताची जादू आणि परिणाम याची महत्ती सांगितली. तसेच या संगिताचा मनावर आणि शारिरावर कसा परिणाम होतो, याची चर्चा केली. विदेशी कंपन्या त्याच्या विमान प्रवासात तिथल्या संगिताची सूरवट लावत असताना भारतीय संगिताशी मखलाशी कशामुळे करण्यात येत आहे, असा रोकडा सवाल विचारत संगिताचार्यांनी विमानतळासह विमान प्रवासातही भारतीय शास्त्रीय संगीत आणि वाद्य संगिताची ताण छेडली जावी अशी गळ घातली आहे. मंत्री शिंदे यांनी या मागणीवर सरकार सहानभूतीपूर्वक विचार करत असल्याचा निरोप धाडला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुम्हाला पॉप आणि जॅझ ऐवजी भारतीय संगिताची मैफल ऐकू आल्यास, कर्नाटकी राग आळवल्याचे सूर कानी पडल्यास तुमचं शरीर आणि मन प्रफुल्लीत होणार यात शंका नाही. या राग दरबारात तुम्ही चिंब भिजल्याशिवाय राहणार नाहीत.
देशी विमानतळावर अनेकदा विदेशी संगिताचा आक्रोश, किंकाळ्या आणि कानठळ्या बसविणा-या सूर कानावर आदळतात. त्यापेक्षा भारतीय संगिताचा वापर केल्यास या गोगांटाळा आळा घालता येईल. अमेरिकन, ऑस्ट्रेलियन विमान कंपन्या पाश्चात्य संगिताला प्राधान्य देतात. त्यामानाने देशी विमान सेवा आणि उड्डाण करणा-या विमानांमध्ये भारतीय संगिताचे सूर चुकूनही कानावर पडत नाहीत. त्यामुळे देशातील संगित क्षेत्रातील दिग्गजांनी नाराजीचा सूर आळवला आणि देशी संगिताला ही चालना मिळायला हवी. आपल्या संगिताचे गोडवे जग गात असताना विमान प्रवासात आणि विमान तळावर शास्त्रीय संगित, भारतीय संगिताची सूरवट का ऐकू येऊ शकत नाही, असा सवाल विचारला आहे. भारतीय संगिताला हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे. या संगिताने मन आणि शरीरारवर चांगला परिणाम होत असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांनी देशी संगिताला प्राधान्य द्यावे अशी मागणी राज्यसभेतील खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि संगीतकारांनी केंद्र सरकारकडे यासंबंधीची मागणी केली आहे. भारतीय एयरलाइंस कंपन्यांमधील फ्लाईट्स आणि विमानतळावर भारतीय संगिताची धून वाजवावी अशी मागणी करण्यात आली. सरकारचे हे छोटेसे पाऊल प्रवाशांना आपल्या देशीपणाच्या भावनेशी घट्ट पकडून ठेवेल आणि त्यांना त्यांचा प्रवासही आठवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.