मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वात एक अशी अभिनेत्री आहे, जी सर्वात महागडी आणि श्रीमंत अभिनेत्री आहे. वयाच्या 39 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री डायना मरिअम कुरियन आहे. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोणी. डायना मरिअम कुरियन हिचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. पण इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताच अभिनेत्रीने हिंदू धर्माचा स्वीकार केला. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने मोठ्या थाटात हिंदू पद्धतील लग्न देखील केलं.
डायना मरिअम कुरियन प्रचंड प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचं नाव देखील बदललं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे तिचं नाव नयनतारा असं आहे. नयनतारा कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
नयनतारा हिने जून 2022 मध्ये दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ती सरोगसीद्वारे आई देखील झाली. अभिनेत्री जुळ्यामुलांची आई आहे. सरोगसीद्वारे आई झाल्यामुळे तिला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. पण अभिनेत्रीने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.
नयनतारा दाक्षिणात्य सिनेश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त दाक्षिणात्य नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नयनतारा एका सिनेमासाठी जवळपास 11 कोटी रुपये मानधन घेते. नुकताच नयनतारा ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.
रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, तिची नेटवर्थ 22 मिलियन म्हणजे जवळपास 165 कोटी आहे. नयनतारा एका सिनेमासाठी तब्बल 11 कोटी रुपये घेते. अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीकडे खासगी विमान देखील आहे. अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.
एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यमुळे तुफान चर्चेत आली होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर प्रभू देवा याच्यासोबत नयनतारा रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांचं नाातं फार काळ टिकून शकलं नाही. कारण प्रभू देवा विवाहित होता…. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नयनतारा पती आणि मुलांसोबत रॉयल आयुष्य जगते.