मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आदित्य सील कियारा सोबत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणू शकला नाही. इंदू की जवानी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल करू शकला नाही. (Indoo Ki Jawani’ fails on its first day at the box office)
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार पहिल्या दिवशी इंदू की जवानी चित्रपटाने 25 लाखांची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, एकाच स्क्रीनवर चित्रपट रिलीज झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये उशिरा प्रदर्शित झाला होता. मात्र, त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर फारसा परिणाम झाला नाही.
अबीर सेन गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात पंजाबी स्टार गुरु रंधावा देखील दिसला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी प्रेमाच्या शोधात डेटिंग अॅपमध्ये अडकते आणि स्वत: साठी समस्या निर्माण करून घेते. चित्रपटात, इंदूला प्रियकरकडून धोका मिळतो. आणि ती डेटिंग वापर करते ती त्यामध्ये हळूहळू फसते. आणि त्यामधून ती कशी पडते हे चित्रपटात दाखवण्याच आले आहे. कियारा आणि आदित्यबद्दल बोलायचे झाले तर या जोडीमध्ये काही खास केमिस्ट्री नाही. चित्रपटाच्या गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर सर्व गाणी प्रेक्षकांना आवडली आहेत.
‘इंदू की जवानी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कियाराशिवाय आदित्य सील मुख्य भूमिकेत आहे. अल्पावधीतच कियारा अडवाणीने तिच्या अभिनयाने चांगली फॅन फॉलोइंग केली आहे.
कोरोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पहिला होता तर, या चित्रपटानंतर बॉलिवूडमधील ‘इंदू की जवानी’ हा दुसरा मोठा चित्रपट आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर काय कमाल होते याची उत्सुकता सर्वांना लागली होती. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी दाखविण्यात यश मिळू शकत नाही, आणि तेच खरे झाले.
संबंधित बातम्या :
Shikha Malhotra | कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, रुग्णालयात दाखल!
विद्या बालनसोबत डर्टी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन, खोलीत सापडला मृतदेह
(Indoo Ki Jawani’ fails on its first day at the box office)