माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो-3’चं कारशेड आरेतच (Aarey) उभारण्याची घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच पुन्हा एकदा हा प्रश्न पेटला. एकीकडे मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. तर दुसरीकडे मेट्रो-3 चं (Metro Carshed) रखडलेलं काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे. यात अभिनेता सुमीत राघवनचाही (Sumeet Raghvan) समावेश आहे. आरेतील मेट्रोच्या कारशेडबाबत सुमीतने वेळोवेळी ट्विट केले आहेत. आता नुकत्याच केलेल्या काही ट्विट्समध्ये त्याने आरेतील मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अत्यंत मार्मिक सल्ला दिला आहे.
‘हे सत्य जाणून घ्या.. कारशेड समर्थकदेखील पर्यावरणाच्या विरोधात नाहीत. पण जागं होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आणि तुमच्या पिढीला अनुकूल अशी ‘तथ्ये’ सांगून खोटी कथा पसरवू नका. #कारशेडवहीबनेगा. अधिक माहितीसाठी SGNP (संजय गांधी नॅशनल पार्क) इथल्या संजय कांबळे यांना भेटा. आंदोलकांनी नुसतं फलक घेऊन उभं राहून आणि झाडांना मिठी मारून त्यांचं प्रेम दाखवण्याऐवजी त्यांना त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून काहीतरी उपयुक्त करायला सांगा. समाजाचं तसंच या प्राण्यांचं भलं करा. योगदान देऊन महाराष्ट्र सरकारचा भार थोडा हलका करा. बरोबर ना? रणजीत, मला खात्री आहे की तुम्हाला माहित असेल की SGNP मध्ये एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही पिंजऱ्यातील प्राण्याला एका वर्षासाठी दत्तक घेऊ शकता आणि त्याच्या/तिच्या अन्न आणि वैद्यकीय खर्चासाठी पैसे देऊ शकता. मी तारा (2018) आणि आतिश (2019) (बिबट्याची पिल्लं) यांना दत्तक घेतलं होतं. जर तुम्ही याबद्दल जनजागृती करू शकलात तर मला खूप आवडेल,’ असं ट्विट सुमीतने केलं आहे.
Get this fact straight,even the carshed supporters aren’t against the environment. But it’s time to wake up and smell the coffee. Don’t spread false narratives by stating “facts” that suit you and your clan.
?#CarShedWahiBanega
Meet Sanjay Kamble at SGNP for more details.
3/3 pic.twitter.com/FOFFDtrCgV— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 9, 2022
amongst the protesters. Instead of just standing with placards and hugging trees to show their love,tell them to spend money from their pockets and do something useful. Do good for the society as well as for these animals. GoM ka bhaar thoda halka karo by contributing. Right?
2/n pic.twitter.com/77T4DBiQ7T— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 9, 2022
Ranjeet,i am sure you know that there is a programme in SGNP wherein you adopt a caged animal for a year & pay for his/her food & medical expenses. I had adopted Tara(2018) & Aatish (2019) (leopard cubs). I would really appreciate it if you could spread this awareness..
1/n https://t.co/rOVomMk65n pic.twitter.com/EguNv1aOOm— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 9, 2022
बहुचर्चित कुलाबा- वांद्रे – सिप्झ मेट्रो- 3चं कारशेड आरे कॉलनीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो- 3चं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचं 25 टक्के कामही पूर्ण झालं होतं. मात्र, नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचं नुकसान होणार असल्याचं सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग इथं करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.