मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे हे बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 चा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा प्रोमो पाहून अनेकजण चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. बिग बॉस 17 च्या घरात मोठे भांडणे होताना दिसत आहेत. थेट ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये हे भांडणे होत होत आहेत. इतकेच नाही तर ईशा आणि अभिषेक कुमार यांची भांडणे सोडवण्यासाठी संपूर्ण सदस्यांना यावे लागले. यावेळी ईशा ही थेट अभिषेक कुमार याला धक्के मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात ईशा आणि समर्थ यांच्यामध्ये वाद झाल्याचे बघायला मिळाले. भांडणामध्ये तर ईशा हिने थेट म्हटले होते की, तुझ्यापेक्षा अभिषेक मला नक्कीच जास्त समजून घेतो. ईशा आणि अभिषेक कुमार यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाले. ईशा सध्या समर्थ याला डेट करत आहे.
भांडणामध्ये अभिषेक कुमार हा ईशा हिला म्हणतो की, तुझा खरा चेहरा हा आता पुढे आला. आता कळाले मला तुझ्याबद्दल सर्वकाही. आता थोडी काही बोलणार…चल निघ इथून…यानंतर ईशा ही अभिषेक कुमार याला म्हणते की, अभिषेक बदतमीजी अजिबात करू नकोस. यानंतर थेट ईशा ही अभिषेक कुमार याला धक्का मारताना दिसत आहे.
या भांडणामध्ये मग समर्थ हा पडतो आणि दोघांनाही दूर करतो. मात्र, त्यानंतर ही भांडणे चांगलीच वाढताना दिसत आहेत. घरातील सर्वच सदस्य हे या भांडणामध्ये पडल्याचे बघायला मिळत आहेत. आता हाच प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. आज बिग बाॅस 17 च्या घरात मोठे वाद होताना दिसणार आहेत.
ही पहिली वेळ नाही की, ईशा आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये बिग बाॅस 17 च्या घरात वाद होत आहे. यापूर्वीही यांच्यामध्ये मोठी भांडणे झाली. इतकेच नाही तर थेट सलमान खान याच्यासमोरच बिग बाॅस 17 च्या स्टेजवर ईशा हिने अभिषेक कुमार याच्यावर गंभीर आरोप केले. ईशा हिच्या या आरोपांनंतर लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले.