मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या अफेअरच्या चर्चा तुफान रंगल्या. पण सेलिब्रिटींचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर नात्यात सतत होत असलेल्या भाडणांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण ब्रेअकपनंतर कपल्सने एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केलं. आता देखील टीव्ही विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलने ब्रेकअपनंतर एकमेकांवर गंभीर आरोप केले. अभिनेता अभिषेक कुमार आणि अभिनेत्री ईशा मालवीय यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे दोघांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे ‘बिग बॉस १७’ शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. ‘बिग बॉस १७’ शोच्या मंचावर दोघे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ईशा एक्स-बॉयफ्रेंडवर अत्याचाराचे आरोप लावताना दिसत आहे. अभिनेत्रीने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेता सलमान खान ईशा हिला समजवताना दिसत आहे.
Physical violence, nails ye kya kya hora hai + this fight is looking so fake#AbhishekKumar#BB17#BiggBoss17#IshaMalviyapic.twitter.com/MqVkCCznHN
— Shanvi (@ivy______0) October 15, 2023
सलमान खान अभिनेत्रीला म्हणतो, ‘तू अभिषेक याच्यावर गंभीर आरोप करत आहेस, ज्यामुळे त्याचं करियर उद्ध्वस्त होवू शकतं.’ पण तरी देखील ईशा थांबत नाही. अभिषेक याच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य करताना दिसत आहे. एवढंच नाही तर, अभिषेक याने देखील एक्स-गर्लफ्रेंड ईशा हिच्यावर गंभीर आरोप केले.
अभिनेता म्हणाला, ‘तिने मला नखे मराली, माझे ओठ कुरतडले… मारहाण करण्यास सुरूवात आधी ईशा हिने केली…’ असं देखील अभिनेता म्हणताना दिसत. ईशा आणि अभिषेक यांच्यातील वाद वाढल्यानंतर सलमान खान देखील निराश होतो आणि मागे वळतो.. सध्या सर्वत्र ईशा आणि अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७’ला सुरुवात झाली आहे. शोमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि युट्यूबर देखील दिसत आहेत. शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन, अभिनेता निल आणि पत्नी ऐश्वर्या यांची देखील एन्ट्री झाली आहे. आता शोमध्ये पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष ला