मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी इस्त्रायलमध्ये गेली होती. पण शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Palestine Crisis) केल्यामुळे अभिनेत्री इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर येताच अभिनेत्रीच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता अभिनेत्रीबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. नुसरत भरूचा हिच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात भिनेत्री सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय अभिनेत्रीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नुसरत हिची चर्चा सुरु आहे.
अभिनेत्रीच्या टीममधील एक महिला संचिता त्रिवेदी हिने दिलेल्या माहितीनुसार, नुसरत हिच्यासोबत संपर्क होवू शकला आहे. दूतावासाच्या मदतीने तिला सुखरूप मायदेशी परत आण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. थेट विमान मिळत नसल्यामुळे तिला कनेक्टिंग फ्लाइटच्या मदतीने भारतात आणलं जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर, अधिक माहिती सांगणं शक्य नाही. पण नुसरत भारतात परतल्यानंतर तुम्हाला कळवू…अशी माहिती सध्या समोर येत आहे.
शुक्रवारी झाला होता अभिनेत्रीसोबत संपर्क
हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री तिथे गेली होती. या फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीचा ‘अकेली’ सिनेमा दाखवण्यात आला. नुसरतशी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यादरम्यान ती बेसमेंट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली होती. आता अभिनेत्री भारतात परतत असल्यामुळे चाहते आणि नुसरत हिच्या कुटु्ंबियांनी मोकळा श्वास घेतला आहे.
नुसरत भरुचा हिच्या ‘अकेली’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला होता. इराकच्या गृहयुद्धात एक स्त्री एका अज्ञात ठिकाणी अडकते, तेव्हा आपल्या घरी परतण्यासाठी जे प्रयत्न करते ते सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र नुसरत भरुचा हिची चर्चा रंगली आहे.
इस्त्रायलमध्ये वादग्रस्त परिस्थिती
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमध्ये युद्ध सुरू आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. या तणावग्रस्त वातावरणात नुसरतच्या जवळच्या नातेवाईकांना कोणतीही खबर न मिळाल्याने ते खूपच चिंतेत होते. पण आता अभिनेत्री भारतात परत येणार आहे.