मुंबई: ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. हा चित्रपट असभ्य आणि प्रचारकी असल्याची टिप्पणी त्यांनी मंचावर बोलताना केली. नदाव यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दर्शन कुमार, चित्रपट निर्माते अशोक पंडित आणि दिग्दर्शिक विवेक अग्निहोत्री यांनी पलटवार करत टीका केली. आता भारतातील इस्राइलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी नदाव यांच्या वक्तव्याची निंदा केली. ‘इस्राइलमध्ये तुम्हाला जे नापसंत आहे, त्यावर निंदा करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात, मात्र दुसऱ्या देशावर आपली नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही’, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.
गिलॉन यांनी नदाव यांना खुलं पत्रच लिहिलं आहे. भारतीयांना समजावं यासाठी त्यांनी हे पत्र हिब्रू भाषेत लिहिलं नाही. “तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भारतीय संस्कृतीत म्हटलं जातं की अतिथी देवो भव. अतिथी हे देवासमान मानले जातात. मात्र भारताकडून तुम्हाला अध्यक्षतेसाठी मिळालेल्या निमंत्रणाचा अत्यंत वाईटप्रकारे दुरुपयोग तुम्ही केला आहे,” असं त्यांनी या पत्रात म्हटलंय.
‘हा एक हाय-टेक देश आहे आणि त्यात फिल्म इंडस्ट्रीशी जोडून घेण्याची क्षमता आहे. आम्ही भारतीय चित्रपट पाहून लहानाचे मोठे झालो. चित्रपटाची इतकी मोठी संस्कृती असलेला भारत जेव्हा इस्रायली कंटेटला प्रोत्साहन देतोय (फौदा आणि इतर) तर आपण विनम्रतेने वागलं पाहिजे’, असंही ते म्हणाले.
1. In Indian culture they say that a guest is like God. You have abused in the worst way the Indian invitation to chair the panel of judges at @IFFIGoa as well as the trust, respect and warm hospitality they have bestowed on you.
— Naor Gilon (@NaorGilon) November 29, 2022
‘मी कोणी फिल्म एक्स्पर्ट नाही. मात्र मला इतकं नक्कीच माहीत आहे की ऐतिहासिक घटनांच्या खोलात जाऊन अभ्यास करण्यापूर्वी त्यावर भाष्य करणं चुकीचं असेल. भारतातील अनेक लोकांनी त्याची किंमत मोजली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो’, अशा शब्दांत त्यांनी नदाल यांना सुनावलं.
I also said that we should be humble when India, with such a great film culture, is consuming Israeli content (Fauda and more).
— Naor Gilon (@NaorGilon) November 29, 2022
The friendship between the people and the states of India and Israel is very strong and will survive the damage you have inflicted.
As a human being I feel ashamed and want to apologize to our hosts for the bad manner in which we repaid them for their generosity and friendship.— Naor Gilon (@NaorGilon) November 29, 2022
नदाल यांच्या वक्तव्यानंतर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांचा उल्लेख करत त्यांनी पुढे लिहिलं, “तुम्ही हा विचार करून इस्राइलला परत जाणार की तुम्ही खूप बोल्ड आहात आणि तुमचं हे विधानसुद्धा खूप बोल्ड आहे. मात्र मी आणि इस्राइलचे प्रतिनिधी इथेच राहणार आहेत. आपलं धाडस दाखवल्यानंतर तुम्ही आमचा डीएम (डायरेक्ट मेसेज) बॉक्स पाहिलं पाहिजे. टीमवर त्याचा काय परिणाम होतोय, हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. भारत आणि इस्राइलच्या लोकांमध्ये आणि राज्यांमध्ये चांगली मैत्री आहे आणि तुम्ही या मैत्रीला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या नुकसानाची भरपाई आम्ही करूच. पण माणूस म्हणून मला तुमची लाज वाटतेय.”