Amruta Fadnvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील अमृता फडणवीस कायम सक्रिय असतात. आता इन्स्टाग्रामवर अमृता फडणवीस यांनी एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये त्यांची नवीन स्टाईल पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीस यांचा नवा लूक काही नेटकऱ्यांना आवडला, तर काहींनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
नुकताच अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी घातलेल्या ड्रेसवर अनेकांनी आक्षेप घेत त्यांना ट्रोल केलं आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना अमृता फडणवीस यांची नवीन स्टाईल आवडली आहे, तर अनेकांनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. (amruta fadnavis dressing style)
अमृता फडणवीस यांच्या फोटोवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मॅडम, असे कपडे घालणे शोभत नाही तुम्हाला,, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांच्या अर्धागिनी आहात तुम्ही, तुम्ही असे वागला तर बाकीचे काय आदर्श घेणार तुमच्याकडून, बाई साडीमध्येचं खूप छान दिसते…’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने अमृता फडणवीस यांच्या फोटोवर केली आहे. (amruta fadnavis axis bank salary)
अमृता फडणवीस यांचा नवा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या लूकचं कौतुक देखील केलं आहे. शिवाय अमृता फडणवीस यांच्या फोटोवर अभिनेता जॉकी श्रॉफ (jackie shroff) याने देखील कमेंट केली आहे. अमृता फडणवीस यांच्या फोटोवर कमेंट करत अभिनेत्याने टाळ्या वाजवताना इमोजी पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अमृता फडणवीस आणि त्यांना होणाऱ्या विरोधाची चर्चा आहे.
नुकताच अमृता फडणवीस यांचं ‘आज मुड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला. अमृता फडणवीस अनोखी फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे त्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे ‘आज मुड बना लिया’गाणंसुद्धा प्रचंड हीट ठरलं आहे. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सोशल मीडियावर देखील त्यांच्या गाण्यांची चर्चा कायम रंगलेली असते. अनेकदा त्यांना त्यांच्या आवडीमुळे ट्रोल देखील करण्यात आलं. पण कोणत्याही गोष्टकडे लक्ष न देता अमृता फडणवीस कायम स्वतःची आवडत जपताना दिसतात.